गोव्याची उपांत्य फेरी हुकली

फलंदाज अपयशी : प्रभावी गोलंदाजीमुळे पंजाबचा (Punjab) 45 धावांनी विजय
पंजाबकडून (Punjab) गोव्याचा (Goa) पराभव
पंजाबकडून (Punjab) गोव्याचा (Goa) पराभव Dainik Gomantak

पणजी: पंजाबला (Punjab) जास्त धावा करण्याची मोकळीक गोव्याने (Goa) दिली नाही, पण आव्हानाचा पाठलाग करताना फलंदाज अपयशी ठरल्यामुळे त्यांना 25 वर्षांखालील एकदिवसीय क्रिकेट (Cricket) स्पर्धेची उपांत्य फेरी हुकली.

पंजाबकडून (Punjab) गोव्याचा (Goa) पराभव
रेल्वेचा महिला संघ गोव्यास भारी

बंगळूर येथील अळूर स्टेडियमवर रविवारी झालेल्या उपांत्यपूर्व लढतीत पंजाबने गोव्याला ४५ धावांनी हरविले. पंजाबने गोलंदाजीत प्रभावी कामगिरी बजावताना 235 धावांचे यशस्वीपणे संरक्षण केले. गोव्याचा डाव 48 षटकांत 190 धावांत संपुष्टात आला. गोव्याने या स्पर्धेत प्रथमच उपांत्यपूर्व फेरी गाठली होती.

चांगल्या सुरुवातीनंतर घसरण

गोव्याची सुरवात चांगली होती. आविष्कार मोने (31, 19 चेंडू, 5 चौकार, 1 षटकार) याच्या आक्रमक फलंदाजीमुळे गोव्याला 46 धावांची सलामी मिळाली, पण तो बाद झाल्यानंतर फलंदाज ठराविक अंतराने बाद होत गेले. नियमित कर्णधार सुयश प्रभुदेसाई याची अनुपस्थिती गोव्याला मध्यफळीत प्रकर्षाने जाणवली. तुनीष सावकारने (29) किल्ला लढविण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचे प्रयत्न तोकडे ठरले. गोव्याच्या डावात नवव्या क्रमांकावरील धीरज यादव याने सर्वाधिक 41 धावा केल्या, पण त्याला साथ देण्यासाठी केवळ शेवटचा गडी बाकी होता. धीरजने 46 चेंडूंतील खेळीत सहा चौकार मारले. पंजाबच्या प्रिन्स बलवंत राय याने चौघांना बाद केले, अभिनव शर्माने तीन व पारस जैदका याने दोन गडी बाद केले.

पंजाबकडून (Punjab) गोव्याचा (Goa) पराभव
Omicron Variant: भारताचा दक्षिण अफ्रिका दौरा पुढे ढकलला

मोहितची सफल फिरकी

गोव्याने नाणेफेक जिंकून पंजाबला प्रथम फलंदाजीस पाचारण केले. दुसऱ्या षटकात समीत आर्यन मिश्रा याने गोव्याला यश मिळवून दिल्यानंतर विश्वप्रताप सिंग (36) व नेहाल वधेरा (46) यांनी दुसऱ्या विकेटसाठी 85 धावा करून डाव सावरला. फिरकी गोलंदाज मोहित रेडकरने सलग दुसऱ्या लढतीत प्रभाव पाडताना पंजाबला 25व्या षटकांत 4 बाद 106 असे संकटात टाकले. मोहितने गोव्यातर्फे सफल मारा करताना 43 धावांत 4 गडी बाद केले. पंजाबची स्थिती 37व्या षटकात 7 बाद 159 अशी निराशाजनक असताना इकज्योतसिंग थिंड (19) व अभिनव शर्मा (29) यांनी आठव्या विकेटसाठी 53 धावांची भागीदारी करून संघाला दोनशे धावांच्या पार नेले. हीच भागीदारी पंजाबसाठी निर्णायक ठरली. मोहितव्यतिरिक्त गोव्यासाठी समीत आर्यन मिश्रा व निहाल सुर्लकरने प्रत्येकी दोन गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक

पंजाब : 50 षटकांत 9 बाद 235 (विश्वप्रताप सिंग 36, नेहाल वधेरा 46, पुखराज मान 28, सलिल अरोरा 20, इकज्योतसिंग थिंड 19, अभिनव शर्मा 29, प्रेरित दत्ता नाबाद 17, हेरंब परब 8-0-50-0, समीत आर्यन मिश्रा 10-1-34-2, निहाल सुर्लकर 9-0-50-2, धीरज यादव 8-0-24-0, मोहित रेडकर 10-1-43-4, आविष्कार मोने 5-0-27-1) वि. वि. गोवा : 48 षटकांत सर्वबाद 190 (मंथन खुटकर 15, आविष्कार मोने 31, कश्यप बखले 9, आलम खान 5, तुनीष सावकार 29, आदित्य सूर्यवंशी 14, मोहित रेडकर 20, निहाल सुर्लकर 7, धीरज यादव 41, हेरंब परब 0, समीत आर्यन मिश्रा नाबाद 4, पारस जैदका 9-0-42-2, अभिनव शर्मा 8-1-14-3, प्रिन्स बलवंत राय 10-1-42-4, नमन धीर 6-1-24-1).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com