Katya Cuelho
Katya Cuelho Dainik Gomantak
क्रीडा

International Windsurfing Cup स्पर्धेत गोव्याची शान; कात्या कुएल्होने जिंकले 'रौप्य'

किशोर पेटकर

पणजी: गोव्याची प्रमुख सेलर कात्या कुएल्हो हिने थायलंडमधील पट्टाया येथे रविवारी झालेल्या आंतरराष्ट्रीय विंडसर्फिंग कप स्पर्धेत आयक्यू (विंड) फॉईलमध्ये रौप्यपदक मिळविले. असा पराक्रम करणारी ती पहिली भारतीय महिला विंडसर्फर ठरली.

दरम्यान, पुढील वर्षी चीनमधील (China) हँगझोऊ येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी कात्या हिने यापूर्वीच भाऊ डेन कुएल्हो याच्यासह पात्रता मिळविली आहे. ती सलग दुसऱ्यांदा आशियाई स्पर्धेत भाग घेईल. यापूर्वी २०१८ मधील जकार्ता येथील आशियाई क्रीडा स्पर्धेत ती सहभागी झाली होती. याशिवाय २०१४ साली चीनमधील नँजिंग येथे झालेल्या यूथ ऑलिंपिकमध्येही (Olympics) तिने भारताचे प्रतिनिधित्व केले होते. आशियाई क्रीडा स्पर्धा आणि यूथ ऑलिंपिकमध्ये सहभागी होणारी ती एकमेव भारतीय महिला विंडसर्फर आहे.

पात्रता स्पर्धेत अव्वल

यावर्षी मे महिन्यात मुंबईत (Mumbai) झालेल्या भारतीय यॉटिंग असोसिएशनच्या आशियाई क्रीडा स्पर्धा पात्रता फेरीत कात्या हिने आयक्यू फॉईल प्रकारात अव्वल क्रमांक मिळविला होता. गोवा यॉटिंग असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, थायलंडमधील स्पर्धेसाठी कात्या हिला गोवा क्रीडा प्राधिकरणाचे सहकार्य लाभले, यामध्ये स्पर्धा सहभाग आणि १५ दिवसीय प्रशिक्षण अनुदानाचा समावेश होता. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या तयारीनिमित्त तिच्यासाठी पट्टाया येथील स्पर्धा खूप महत्त्वाची होती, कारण या स्पर्धेतील आयक्यू फॉईल शर्यतीत आशियाई स्पर्धेत पात्र ठरलेले इतर देशातील स्पर्धकही सहभागी झाले होते. ऑगस्ट महिन्यात नेदरलँड्समध्ये जागतिक सेलिंगतर्फे घेण्यात येणाऱ्या एमर्जिंग नेशन्स प्रोग्रॅमअंतर्गत प्रशिक्षण शिबिरात कात्या भाग घेईल.

क्रीडामंत्र्यांचे मानले आभार

पट्टायातील रुपेरी कामगिरीनंतर कात्याने सहकार्याबद्दल सोशल मीडियाद्वारे क्रीडामंत्री गोविंद गावडे, गोवा (Goa) क्रीडा प्राधिकरण आणि गोवा यॉटिंग असोसिएशनचे आभार मानले. कात्या हिने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत १३ वेळा राष्ट्रीय पदक, २ वेळा आशियाई ब्राँझपदक जिंकले आहे. क्रीडापटूंच्या आर्थिक अनुदान योजनेसाठी तिने गोवा क्रीडा प्राधिकरणाकडे अर्ज केला असून प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती गोवा यॉटिंग असोसिएशनतर्फे देण्यात आली. आशियाई स्पर्धेसाठी तयारी करताना कात्या सध्यातरी सरकारी आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Urban Bank: ''म्‍हापसा अर्बनच्‍या दयनीय स्‍थितीला पर्रीकरचं जबाबदार'', रमाकांत खलप यांचा सनसनाटी आरोप

Goa Drug Case: पिशवीत सापडला दोन लाखांचा गांजा; तिस्क उसगाव येथे तरुणाला अटक

Lok Sabha Election 2024: भाजपच्या मंत्रिमंडळातच बलात्कारी, मग महिलांना सुरक्षा कशी मिळणार? इंडिया अलायन्सच्या नेत्यांचा घणाघात

Goa Today's Live News Update: ओल्ड गोवा येथे कारचा अपघात

Goa Cyber Crime: UAE च्या बँकेत नोकरीचे आमिष; चिंबलच्या तरुणीला मुलाखतीत कपडे काढण्यास सांगितले, गुन्हा नोंद

SCROLL FOR NEXT