ऑस्ट्रेलिया 4 मार्चपासून पाकिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. ऑस्ट्रेलियन संघाचा सलामीवीर उस्मान ख्वाजाही पाकिस्तानविरुद्धच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग असू शकतो. पाकिस्तानात जन्मलेला उस्मान (Usman Khwaja) हा ऑस्ट्रेलियाचा (Australia) महत्त्वाचा खेळाडू आहे. मात्र या मालिकेपूर्वी त्याने असे काही भाष्य केले आहे, जे पाकिस्तानच्या अनेक माजी क्रिकेटपटूंना आवडले नसणार. उस्मान ख्वाजाने पाकिस्तानी मीडियासमोर (Pakistani Media) इंडियन प्रीमियर लीगचे (IPL) कौतुक केले आहे. (In Front Of The Pakistani Media Usman Khwaja Has Praised The IPL)
उस्मान म्हणाला, ''पाकिस्तान सुपर लीग (Pakistan Super League) किंवा इतर कोणत्याही लीगची आयपीएलशी तुलना होऊ शकत नाही. पीएसएल आणि आयपीएलमध्ये कोणताही सामना नाही.''
उस्मान ख्वाजा पुढे म्हणाला, 'आयपीएल ही जगातील सर्वात आर्थिकदृष्ट्या मजबूत लीग आहे. पीएसएल आणि आयपीएलमध्ये काहीच तुलना नाही. साऱ्या जगाचे लक्ष आयपीएलकडे असते. ही एकमेव लीग आहे, जिथे भारतीय खेळाडू खेळतात. यामुळे आयपीएल ही जगातील सर्वोत्तम लीग ठरते.'
उस्मान ख्वाजाही आयपीएल खेळला
उस्मान ख्वाजा 2016 मध्ये देखील आयपीएल खेळला आहे. रायझिंग पुणे सुपरजायंटकडून खेळणाऱ्या उस्मानने 6 सामन्यात 21 पेक्षा जास्त सरासरीने 127 धावा केल्या आहेत. यानंतर मात्र उस्मानला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. टी-20 फॉरमॅटमधील ख्वाजा हा सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. बिग बॅश लीग, पाकिस्तान सुपर लीगमध्ये त्याची फलंदाजी पाहायला मिळाली आहे.
पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया मालिका
ऑस्ट्रेलियाचा संघ जवळपास 3 दशकांनंतर पाकिस्तान दौऱ्यावर पोहोचला आहे. या दौऱ्यात तीन कसोटी, तीन वनडे आणि एक टी-20 सामना खेळवला जाणार आहे. रावळपिंडीमध्ये 4 मार्चपासून पहिली कसोटी होणार आहे. तसेच दुसरी कसोटी 12 मार्चपासून कराचीत होणार आहे. लाहोरमध्ये तिसरी कसोटी 21 मार्चपासून होणार आहे. एकदिवसीय मालिकेतील तिन्ही सामने रावळपिंडीत खेळवण्यात येतील, जे 29 मार्चपासून सुरु होणार आहेत. या दौऱ्याची सांगताही 5 मार्चपासून रावळपिंडीत होणार आहे. दोन्ही संघ एकमेव T20 सामन्यात आमनेसामने येणार आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.