K Hoysala
K Hoysala  Instagram
क्रीडा

Cricketer died on the Field: हृदयद्रावक! 34 वर्षीय क्रिकेटरचा हार्ट अटॅकने मैदानावर कोसळून मृत्यू, क्रिकेटविश्व हेलावले

Pranali Kodre

Karnataka Cricketer K Hoysala Collapses on Field and Died Due To Heart Attack:

क्रिकेट जगताला हादरवणारी एक घटना गुरुवारी (22 फेब्रुवारी) बंगळुरूमध्ये घडली. कर्नाटकचा 34 वर्षीय क्रिकेटपटू होयसाला के याचा अचानक मैदानात असतानाच हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला.

ही घटना बेंगळुरू येथे एजिस साऊथ झोन स्पर्धा सुरू असताना घडली. त्यावेळी कर्नाटकचा संघ तमिळनाडूविरुद्ध सामना खेळत होता. होयसाला संघासह डिनरसाठी जात असतानाच मैदानावर अचानक कोसळला.

त्यामुळे त्याच्यावर मेडिकल स्टाफने लगेचच उपचार केले, तसेच त्याला सीपीआरही दिला. परंतु, तो उपचारांना प्रतिसाद देत नव्हता. त्यावेळी त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये हालवण्याचीही व्यवस्था करण्यात आली. त्याच्या कुटुंबालाही याबाबत लगेचच कळवण्यात आले होते.

तथापि, त्याला हॉस्पिटलमध्ये नेत असतानाच त्याने अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे सध्या क्रिकेट जगतात हळहळ व्यक्त होत आहे. तो 25 वर्षांखालील कर्नाटक संघाकडूनही खेळला होता.

तसेच कर्नाटक प्रीमियर लीगमधील शिवामोग्गा लायन्स आणि बेल्लारी टस्कर्स संघाचेही प्रतिनिधित्व त्याने केले होते. तो कर्नाटक क्रिकेट वर्तुळात एक चांगला क्रिकेटपटू म्हणून ओळखला जात होता. तो वेगवान गोलंदाजी करायचा.

त्याने गुरुवारी तमिळनाडू विरुद्धच्या सामन्यातही कर्नाटकला विजय मिळवून देताना महत्त्वाचे योगदान दिले होते. त्याने 13 चेंडूत 13 धावा केल्या होत्या आणि तमिळनाडूचा सलामीवीर पी प्रविण कुमारची विकेट घेतली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT