Kagiso Rabada PTI
क्रीडा

Kagiso Rabada: भारताविरुद्ध पाच विकेट्स घेत रबाडाने गाठली नवी उंची! दिग्गज गोलंदाजांच्या पंक्तीत सामील

South Africa vs India: भारताविरुद्ध सुरु असलेल्या पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने 5 विकेट्स घेत मोठा विक्रम केला आहे.

Pranali Kodre

South Africa vs India, 1st Test Match at Centurion, Kagiso Rabada 5 Wickets Haul:

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात मंगळवारी (26 डिसेंबर) दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना बॉक्सिंग डे कसोटी असून सेंच्युरियनला हा सामना खेळला जात आहे. या सामन्यात खेळताना दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार तेंबा बाऊमाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला.

दरम्यान, भारतीय फलंदाजांना रबाडाने चांगलेच सतावले. त्याने पाचव्याच षटकात भारताता कर्णधार रोहित शर्माला बाद करत दक्षिण आफ्रिकेला विकेट्सचे खाते उघडून दिले.

रबाडाने नंतर विराट कोहली (38), श्रेयस अय्यर (31), आर अश्विन (8) आणि शार्दुल ठाकूर (24) यांनाही बाद केले. त्यामुळे रबाडाने त्याच्या 5 विकेट्स पूर्ण केल्या. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध पहिल्यांदाच 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली.

रबाडाच्या 500 विकेट्स

याबरोबरच 28 वर्षीय रबाडाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 264 डावात खेळताना 500 विकेट्सही पूर्ण केल्या. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 500 विकेट्स घेणारा दक्षिण आफ्रिकेचा सातवाच गोलंदाज ठरला आहे.

त्याच्यापूर्वी शॉन पोलॉक, डेल स्टेन, मखया एन्टीनी, ऍलन डोनाल्ड, जॅक कॅलिस आणि मॉर्ने मॉर्केल या दक्षिण आफ्रिकन गोलंदाजांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 500 पेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत.

रबाडाने सध्या सुरु असलेल्या सामन्याच्या दुसऱ्या सत्राखेरपर्यंत कसोटीत 285 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच वनडेत 101 सामन्यांत 157 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 56 सामन्यांत 58 विकेट्स घेतल्या आहेत.

सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट्स घेणारे दक्षिण आफ्रिकन गोलंदाज

  • 829 विकेट्स - शॉन पोलॉक

  • 699 विकेट्स - डेल स्टेन

  • 662 विकेट्स - मखया एन्टीनी

  • 602 विकेट्स - ऍलन डोनाल्ड

  • 577 विकेट्स - जॅक कॅलिस

  • 544 विकेट्स - मॉर्ने मॉर्केल

  • 500 विकेट्स - कागिसो रबाडा*

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

Ranji Trophy 2026: पिठिया-भार्गवच्या फिरकीपुढे गोव्याची शरणागती! बडोद्याचा डाव व 135 धावांनी दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT