Justice Markandey Katju Dainik Gomantak
क्रीडा

IND vs PAK: "पाकिस्तान टीम मी माझीच मानतो, पराभवामुळे मला...", पाकड्यांच्या पराभवाचं भारताच्या माजी न्यायमूर्तींना दु:ख

Justice Markandey Katju Pakistan Defeat: काटजू यांनी सोशल मीडियावर स्पष्ट केले की, जरी ते भारतीय असले तरी ते भारत आणि पाकिस्तानला एकच देश मानतात.

Manish Jadhav

Justice Markandey Katju Pakistan Defeat: सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी कोलंबोमधील भारत-पाकिस्तान सामन्यात पाकिस्तानच्या झालेल्या पराभवावर अत्यंत वेगळी आणि चर्चेत राहणारी प्रतिक्रिया दिली. त्यांनी केवळ या पराभवाबद्दल दुःखच व्यक्त केले नाही, तर पाकिस्तान क्रिकेटला पुन्हा उभारी देण्यासाठी चक्क एक पूर्ण आराखडाच मांडला.

काटजू यांनी सोशल मीडियावर स्पष्ट केले की, जरी ते भारतीय असले तरी ते भारत आणि पाकिस्तानला एकच देश मानतात. त्यांच्या मते, ब्रिटीशांनी आपल्या स्वार्थासाठी आणि 'टू नेशन थ्योरी' या खोट्या संकल्पनेच्या आधारावर भारताची फाळणी केली, जेणेकरुन हा अविभाजित देश भविष्यात चीनसारखी मोठी औद्योगिक ताकद बनू नये आणि पाश्चात्य उद्योगांना स्पर्धा निर्माण होऊ नये.

16 फेब्रुवारीच्या सकाळी 8 वाजून 53 मिनिटांनी केलेल्या एका पोस्टमध्ये काटजू यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी म्हटले की, "मी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही क्रिकेट संघांना स्वतःचेच संघ मानतो. त्यामुळे रविवारी (15 फेब्रुवारी) कोलंबोमध्ये पाकिस्तानच्या झालेल्या पराभवाने मला तितकेच दुःख झाले, जितके एखाद्या पाकिस्तानी नागरिकाला झाले असेल." फक्त दुःख व्यक्त करुन प्रश्न सुटणार नाही, असे सांगत त्यांनी पाकिस्तान सरकारला एक मोलाचा सल्ला दिला. त्यांच्या मते, पाकिस्तान (Pakistan) क्रिकेट बोर्डाची सध्याची रचना पूर्णपणे बदलून तिथे अनुभवी दिग्गज खेळाडूंची नियुक्ती करण्याची गरज आहे.

न्यायमूर्ती काटजू यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डासाठी एक नवीन समितीही सुचवले. त्यांच्या प्रस्तावानुसार, या समितीत जावेद मियांदाद यांना अध्यक्ष आणि वसीम अकरम यांना उपाध्यक्ष बनवण्यात यावे. तसेच, या बोर्डाच्या सदस्यांमध्ये वकार युनूस, इंजमाम उल हक, शाहीद आफ्रिदी, शोएब अख्तर आणि एका तज्ज्ञ फिरकीपटूचा समावेश असावा. अशा अनुभवी खेळाडूंच्या हाती सूत्रे सोपवल्यास पाकिस्तान क्रिकेटचे चित्र पालटेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

काटजू यांनी पुढे असेही सुचवले की, या नवीन बोर्डाला संघ निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देण्यात यावे. त्यांना पुरेसा निधी आणि आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करुन दिल्यास हा संघ पुन्हा एकदा जगातील अव्वल संघांपैकी एक बनेल. जर त्यांच्या सल्ल्याची अंमलबजावणी झाली, तर पाकिस्तान 1992 प्रमाणे पुन्हा एकदा विश्वचषक जिंकू शकेल, असा दावाही त्यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT