Just Stop Oil Protesters Dainik Gomantak
क्रीडा

Wimbledon 2023: लॉर्ड्स कसोटीनंतर आता विम्बल्डनमध्येही Just Stop Oil आंदोलनकर्त्यांचा राडा, पाहा व्हिडिओ

Video: विम्बल्डनमधील दोन सामन्यांमध्ये जस्ट स्टॉप ऑईलच्या आंदोलकांमुळे अडथळा आला होता.

Pranali Kodre

Just Stop Oil Protesters disrupted Two Wimbledon Matches: विम्बल्डन 2023 स्पर्धा सध्या लंडनमध्ये सुरू आहे. विविध कोर्टवर सामने खेळवले जात आहेत. पण बुधवारी कोर्ट क्रमांक 18 वर मोठा गोंधळ पाहायला मिळाला. दोन सामन्यांमध्ये आंदोलनकर्त्यांमुळे व्यत्यय आला होता.

सध्या इंग्लंडमध्ये जस्ट स्टॉप ऑईल संस्थेकडून आंदोलने केली जात आहेत. ब्रिटीश सरकारने नवीन तेल, वायू आणि कोळसा प्रकल्पांसाठी सर्व परवाने रद्द करावीत अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

याच आंदोलनातील आंदोलनकर्त्यांनी बुधवारी विम्बल्डनमधील दोन सामन्यांमध्ये व्यत्यय आणला. कोर्ट नंबर 18 मध्ये शो शिमाबुकोरो विरुद्ध ग्रिगॉर दिमित्रोव्ह यांच्यात झालेल्या सामन्यात आणि काटी बोल्टर विरुद्ध दरिया साविल यांच्यात झालेल्या सामन्यात या आंदोलनकर्त्यांनी व्यत्यय आणला होता.

शिमाबुकोरो विरुद्ध ग्रिगॉर यांच्यात झालेल्या सामन्यात दुसऱ्या सेट दरम्यान दोन आंदोलनकर्ते अचानक कोर्टमध्ये शिरले. त्यांनी एका बॉक्समध्ये आणलेले केशरी रंगाच्या कागदाचे तुकडे कोर्टमध्ये उधळले. त्यातील एक आंदोलनकर्ता कोर्टवर बसला देखील होता. पण त्यांना लगेचच सुरक्षा रक्षकांनी पकडून बाहेर नेले.

त्यानंतर बोल्टर विरुद्ध दरिया यांच्यातील सामन्यावेळी पहिला सेटच्या टायब्रेकमध्ये एक आंदोलनकर्ता कोर्टमध्ये आला आणि त्यानेही बॉक्समधील केशरी रंगाचे कागद उधळले. त्यालाही लगेचच सुरक्षा रक्षकांनी पकडले.

यामुळे सामन्यावेळी व्यत्यय आला होता. नंतर कोर्ट साफ करण्यात आले आणि मग हे दोन्ही सामने सुरु झाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, या आंदोलनाची कल्पना असल्याने यापूर्वीच विम्बल्डन आयोजकांनी सुरक्षेत वाढ केलेली आहे. कारण यापूर्वीही काही क्रीडा स्पर्धांमध्ये या आंदोलकांनी व्यत्यय आणलेला आहे.

लॉर्ड्स कसोटीतही व्यत्यय

लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर 28 जून ते 2 जुलै दरम्यान इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या ऍशेस 2023 कसोटी सामन्यावेळीही आंदोलनकर्त्यांनी व्यत्यय आणला होता. दोन आंदोलकांनी केशरी पेंट पावडर मैदानावर उधाळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी त्यांना खेळपट्टीवर जाण्यापासून थांबवले होते. तसेच नंतर सुरक्षारक्षकांनी त्यांना बाहेर नेले होते.

इतकेच नाही, तर यापूर्वीही या आंदोलनकर्त्यांनी प्रीमियर लीग फुटबॉल सामने, रग्बी युनियन प्रिमियरशीप आणि वर्ल्ड स्नुकर चॅम्पियनशीप या स्पर्धांमध्येही अडथळे आणले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Liquor Smuggling: गोव्यातून गुजरातला दारुतस्करी! 1.43 कोटींचा मद्यसाठा जप्त; पिसुर्लेतील डिस्टिलरी सील, 9 जण अटकेत

Mapusa: पाणीपुरवठा ऑफिसमध्ये नेल्या गढूळ पाण्याच्या बाटल्या! म्हापशातील प्रश्न ऐरणीवर; काँग्रेसचा घागर मोर्चाचा इशारा

Reis Magos: रेईश मागूशमधील प्रकल्प DLF ने गुंडाळला? ‘रेरा’कडे नोंदणी मागे घेण्यासाठी अर्ज; 80 बंगल्यांची नोंदणी होणार रद्द

Advalpal: अडवलपालमध्ये नळांद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा! स्थानिकांचे आरोग्य धोक्यात; ‘फोमेंतो’मुळे समस्या उद्भवल्याचा संशय

Amthane Dam: भर पावसातही ‘आमठाणे’ कोरडे! धरणात 5 टक्केच पाणी; पर्यटनावरही परिणाम

SCROLL FOR NEXT