Joe Root Century AFP
क्रीडा

IND vs ENG, 4th Test: जो रुट बनला संकटमोचक! शतकासह इंग्लंडला पहिल्या दिवशी करून दिल्या 300 धावा पार

Joe Root Century: रांचीमध्ये सुरु असेलेल्या कसोटीत भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीला धक्के दिल्यानंतर जो रुटने इंग्लंडचा डाव सांभाळत शतक ठोकण्याबरोबर संघाला ३०० धावांचा टप्पा पार करून दिला.

Pranali Kodre

India vs England, 4th Test in Ranchi, 1st Day Report:

भारत विरुद्ध इंग्लंड संघात कसोटी मालिका खेळली जात असून चौथा सामना शुक्रवारपासून (23 फेब्रुवारी) खेळला जात आहे. रांचीतील जेएससीएस आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना सुरू असून पहिल्या दिवस अखेर इंग्लंडने पहिल्या डावात 90 षटकात 7 बाद 302 धावा केल्या आहेत.

इंग्लंडकडून पहिल्या दिवस अखेर जो रुट 106 धावांवर नाबाद खेळत आहे. तसेच ऑली रॉबिन्सन ३१ धावांवर नाबाद आहे.

या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रुटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला. इंग्लंडकडून झॅक क्रावली आणि बेन डकेट हे सलामी फलंदाजीसाठी उतरले. त्यांना सुरुवातीला मोहम्मद सिराज आणि आकाश दीप यांनी संघर्ष करायला लावला होता.

चौथ्या षटकात पदार्पणवीर आकाशने क्रावलीला त्रिफळाचीतही केले, परंतु त्याने टाकलेला तो चेंडू नो-बॉल ठरल्याने क्रावलीला 4 धावांवर जीवदान मिळाले. परंतु, आकाशने खचून न जाता अचूक टप्प्यावर गोलंजाजी करत फलंदाजांना त्रास देणे सुरू ठेवले होते.

त्याने 10 व्या षटकात इंग्लंडला दुहेरी धक्का देताना दुसऱ्या चेंडूवर बेन डकेटला 11 धावांवर माघारी धाडले, तर चौथ्या चेंडूवर ऑली पोपला पायचीत करत दुसरी विकेट घेतली. त्यानंतरही त्याने या स्पेलमध्ये 12 व्या षटकात जीवदान दिलेल्या क्रावलीला 42 धावांवर माघारी धाडले. त्यामुळे इंग्लंड दबावात आला.

अशावेळी एका बाजूने जो रुटने डाव सांभाळलेला असतानाच जॉनी बेअरस्टोने आक्रमक खेळ केला. पण तो आणखी धोकादायक होण्यापूर्वीच आर अश्विनने त्याचा अडथळा 22 व्या षटकात दूर केला. बेअरस्टो आणि रुट यांच्यात 52 धावांची भागीदारी झाली होती. बेअरस्टोने 35 चेंडूत 38 धावा केल्या.

त्यापाठोपाठ रविंद्र जडेजाने लंचब्रेकपूर्वी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सला एक सुरेख चेंडू टाकत पायचीत केले. हा चेंडू पाहून स्टोक्स पंचांच्या निर्णयाची वाटही न पाहाता माघारी निघाला होता.

मात्र पहिल्या सत्रात मोठे धक्के बसल्यानंतर जो रुटने बेन फोक्सला साथीला घेत इंग्लंडचा डाव सावरण्यास सुरुवात केली. या दोघांनीही संयमी खेळ करताना दुसरे सत्र पूर्ण खेळून काढले. त्यानंतरही त्यांनी तिसऱ्या सत्राची चांगली सुरुवात केली होती.

अखेर त्यांची शतकी भागीदारी 68 व्या षटकात मोहम्मद सिराजने मोडली. त्याने फोक्सला 47 धावांवर बाद केले. फोक्स आणि रुट यांच्यात सहाव्या विकेटसाठी 113 धावांची भागीदारी झाली. दरम्यान फोक्सपाठोपाठ टॉम हर्टलीला 13 धावांवर मोहम्मद सिराजनेच बाद कले.

परंतु नंतर ऑली रॉबिन्सनने रुटची साथ दिली. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी करत भारताला मोठे यश मिळू दिले नाही. या भागीदारीदरम्यान 84 व्या षटकात रुटने चौकारासह त्याचे कसोटीतील 31 वे शतक पूर्ण केले.

हे त्याचे भारताविरुद्धचे 10 वे शतक कसोटी शतक ठरले. त्यामुळे तो भारताविरुद्ध सर्वाधिक कसोटी शतके करणाराही खेळाडू ठरला. दरम्यान, त्याच्या शतकामुळे इंग्लंडने दिवसाखेरपर्यंत 300 धावा पार केल्या.

पहिल्या दिवशी भारताकडून आकाश दीपने 3 विकेट्स घेतल्या. तसेच मोहम्मद सिराजने 2 विकेट्स घेतल्या, तर रविंद्र जडेजा आणि आर अश्विन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job: 'Viral Audio Tape' मागे बदनामी करण्याचा हेतू! आमदार गावकरांनी केली चौकशीची मागणी

Rashi Bhavishya 14 November 2024: व्यवसायातून खास फायदा होईल, आपल्या दिलदार स्वभावामुळे लोकं प्रसन्न राहतील; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Goa Crime: धक्कादायक! वडिलांवर धारदार शस्त्राने वार करून मुलाने संपवले जीवन; उसगावात खळबळ

Professional League: चुरशीच्या लढतीत FC Goaचा पराभव! कुठ्ठाळी व्हिलेजर्सने दिली 3-2 अशी मात

Ranji Trophy: गोव्याला दुसऱ्याच दिवशी दणदणीत विजयाची संधी! 'तेंडुलकर'च्या पाच विकेटनंतर 'कश्यप', 'स्नेहल' यांची शतके

SCROLL FOR NEXT