Joe Root Dainik Gomantak
क्रीडा

World Cup 2023: जो रुटने रचला इतिहास, वर्ल्ड कपमध्ये 'ही' कामगिरी करणारा बनला पहिला इंग्लिश फलंदाज

Manish Jadhav

World Cup 2023: यंदाचा विश्वचषक गतविजेत्या इंग्लंडसाठी चांगला गेला नाही. संघाला पूर्ण हंगामात म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही. फलंदाजांसोबत गोलंदाजही मैदानावर झगडताना दिसले. दरम्यान, गेल्या काही सामन्यांमध्ये धावांसाठी झगडत असलेला इंग्लिश फलंदाज जो रुटने पुन्हा लय पकडली आहे.

पाकिस्तानविरुद्ध सुरु असलेल्या सामन्यात त्याने आपला जलवा दाखवून दिला. आपल्या संघासाठी सर्वाधिक धावा करणारा दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू ठरला आहे. पाकिस्तानविरुद्ध तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने एकूण 72 चेंडूंचा सामना केला.

दरम्यान, तो 83.33 च्या स्ट्राइक रेटने 60 धावा करण्यात यशस्वी झाला. यावेळी त्याने एक विशेष कामगिरीही केली.

दरम्यान, 32 वर्षीय रुट विश्वचषकात (World Cup) 1000 हून अधिक धावा करणारा इंग्लंडचा पहिला फलंदाज ठरला आहे. रुटनंतर माजी क्रिकेटपटू ग्रॅहम गूचचे नाव येते. गूचने 1979 ते 1992 दरम्यान विश्वचषक स्पर्धेत इंग्लिश संघासाठी एकूण 21 सामने खेळले होते. यादरम्यान, 21 डावांत त्याच्या बॅटमधून 44.85 च्या सरासरीने 897 धावा आल्या होत्या. विश्वचषकात त्याच्या नावावर एक शतक आणि आठ अर्धशतके आहेत.

दुसरीकडे, पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) खेळल्या जाणाऱ्या सामन्यानंतर रुटच्या नावावर 1034 धावा झाल्या आहेत. रुटने विश्वचषकात इंग्लंडकडून एकूण 26* सामने खेळले आहेत. दरम्यान, त्याने 25 डावांत 44.95 च्या सरासरीने आपल्या बॅटने 1034 धावा केल्या आहेत. रुटच्या नावावर विश्वचषकात तीन शतके आणि सहा अर्धशतके आहेत.

विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारे शीर्ष 5 फलंदाज:

2278 धावा – 44 डाव – सचिन तेंडुलकर – भारत

1743 धावा – 42 डाव – रिकी पाँटिंग – ऑस्ट्रेलिया

1573 धावा – 34 डाव – विराट कोहली – भारत

1532 धावा – 35 डाव – कुमार संगकारा – श्रीलंका

1491 धावा – 27 डाव – डेव्हिड वॉर्नर – ऑस्ट्रेलिया

जो रुटची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द:

जो रुटने आतापर्यंत इंग्लंडकडून एकूण 338 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. दरम्यान, त्याच्या बॅटने 437 डावांत 18831 धावा केल्या आहेत. रुटने कसोटी क्रिकेटच्या 247 डावांमध्ये 50.29 च्या सरासरीने 11416 धावा, एकदिवसीय क्रिकेटच्या 160 डावात 47.61 च्या सरासरीने 6522 धावा आणि टी20 च्या 30 डावांमध्ये 35.72 च्या सरासरीने 893 धावा केल्या आहेत.

विश्वचषक 2023 मधील सर्व संघांविरुद्ध रुटची कामगिरी:

77 धावा – न्यूझीलंड वि

82 धावा – बांगलादेश वि

11 धावा – अफगाणिस्तान वि

02 धावा – दक्षिण आफ्रिका वि

03 धावा – श्रीलंका वि

00 धावा – भारत वि

13 धावा – ऑस्ट्रेलिया वि

28 धावा – नेदरलँड्स वि

60 धावा – पाकिस्तान वि

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

SCROLL FOR NEXT