Jasprit Bumrah Dainik Gommantak
क्रीडा

Jasprit Bumrah: पुनरागमनासाठी कॅप्टन बुमराह आतुर! नेटमध्ये करतोय बाउंसर, यॉर्करचा मारा, पाहा Video

India vs Ireland: आयर्लंडविरुद्ध जसप्रीत बुमराह कर्णधार म्हणून पुनरागमन करणार असून यासाठी तो जोरदार तयारी करत आहे.

Pranali Kodre

Jasprit Bumrah bowls bouncers and yorkers in net session:

भारताचा टी20 संघ सध्या आयर्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारतीय संघाला यजमान आयर्लंडविरुद्ध 3 सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. हा दौरा भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहसाठी महत्त्वाचा आहे. तो या दौऱ्यातून 10 महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे.

बुमराह सध्या त्याच्या पुनरागमनासाठी जोरदार तयारी करत असून मालिकेपूर्वी डब्लिनमध्ये नेटमध्ये गोलंदाजी करतानाचा त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. बीसीसीआयने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

या व्हिडिओमध्ये 29 वर्षीय बुमराह वेगवान गोलंदाजी करता बाऊन्सर आणि यॉर्कर चेंडू टाकताना दिसत आहे. त्याच्या या व्हिडिओवर चाहत्यांच्या बऱ्याच प्रतिक्रिया आल्या असून अनेकांनी बुमराहला पुनरागमासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

बुमराहच्या पुनरागमनावर लक्ष

बुमराहच्या पुनरागमनावर सर्वांचेच लक्ष राहाणार आहे. कारण आगामी आशिया चषक आणि वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या दृष्टीने बुमराह भारतीय संघासाठी महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याच्या संघात असण्याने डेथ ओव्हर्समधील गोलंदाजीची समस्या बऱ्यापैकी सुटेल.

तसेच बुमराह भारतासाठी गेल्या अनेक वर्षे महत्त्वाचा गोलंदाजही राहिला आहे. त्याचमुळे जर या मालिकेतून त्याचे पुनरागमन यशस्वी ठरले, तर भारतासाठी ही सकारात्मक गोष्ट असेल.

बुमराहवर झाली आहे शस्त्रक्रिया

बुमराहला गेल्यावर्षी पाठीच्या दुखापतीचा मोठ्या प्रमाणात त्रास झाला होता. ज्यामुळे त्याला एप्रिल 2023 मध्ये शस्त्रक्रियाही करून घ्यावी लागली.

याचमुळे बुमराह आयपीएल 2023 स्पर्धेलाही मुकला, त्याचबरोबर कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही त्याला खेळला आलेले नाही. त्याआधी तो गेल्यावर्षी टी२० वर्ल्डकप स्पर्धेलाही मुकला.

त्याने अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना 25 सप्टेंबर 2022 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मालिकेत खेळला होता.

बुमराहची आंतरराष्ट्रीय कारकिर्द

जसप्रीत बुमराहने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत आत्तापर्यंत कसोटीत 30 सामन्यांत 128 विकेट्स घेतल्या. तसेच 72 वनडे सामन्यात 121 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर 60 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांत 70 विकेट्स घेतल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मानवी क्रौर्याची परिसीमा! शीर, हात आणि पाय नसलेला आढळला मृतदेह, खुनाच्या भयानक घटनेने खळबळ; पोलिसांकडून तपास सुरु

Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा 'राऊडी'पणा महागात, महागड्या गोलंदाजीनंतर अम्पायरनं फटकारलं; काय घडलं नेमकं? VIDEO

25 जणांचे बळी घेणाऱ्या नाईट क्लब आगीच्या दुर्घटनेची हायकोर्टाकडून दखल; बेकायदा बांधकामे, व्यवसाय रडारवर

Goa Delhi Indigo Flight: लग्नाला जाताना पॅनिक अटॅक, अचानक बेशुद्ध पडली, डॉ अंजली निंबाळकरांनी वाचवला अमेरिकन तरुणीचा जीव; गोवा-दिल्ली फ्लाईटमधील थरार! VIDEO

Suryakumar Yadav: 'आता हा शॉट खेळू नको' सूर्याच्या खराब कामगिरीवर गावसकर नाराज, दिला 'हा' महत्त्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT