Jasprit Bumrah Dainik Gomantak
क्रीडा

IND vs SL: बुमराह इज बॅक! श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियात मोठा बदल

जसप्रीत बुमराहचे भारताच्या वनडे संघात पुनरागमन झाले आहे.

Pranali Kodre

Jasprit Bumrah: भारत विरुद्ध श्रीलंका संघात 3 जानेवारीपासून तीन सामन्यांची टी20 मालिका खेळवली जाणार आहे. त्यानंतर 10 जानेवारीपासून वनडे मालिकेला सुरुवात होईल. दरम्यान वनडे मालिकेसाठी भारतीय निवड समीतीने भारतीय संघात मोठा बदल केला आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.

बुमराह सप्टेंबर 2022 पासून भारतीय संघातून बाहेर होता. त्याला पाठीच्या दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर राहावे लागले होते. बुमराह ऑस्ट्रेलियामध्ये गेल्यावर्षी झालेल्या टी20 वर्ल्डकपलाही या दुखापतीमुळे मुकला होता.

पण आता तो या दुखापतीतून सावरला आहे. तो सध्या बंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (एनसीए) रिहॅबिलेटशन प्रोग्राम करत होता. एनसीएने तो पूर्ण तंदुरुस्त झाल्याचे स्पष्ट केले आहे.

त्यामुळे त्याचा श्रीलंकेविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. आता या मालिकेसाठी त्याच्यासह भारतीय संघात मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक आणि अर्शदीप सिंग या वेगवान गोलंदाजांचाही समावेश आहे. तसेच अष्टपैलू हार्दिक पंड्याही या वेगवान गोलंदाजी फळीचा भाग आहे.

दरम्यान, श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी विश्रांती दिलेले रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, श्रेयस अय्यर यांसारखे खेळाडूही वनडे मालिकेतून भारतीय संघात पुनरागमन करणार आहेत.

वनडे मालिकेतील पहिला सामना गुवाहाटी येथे 10 जानेवारी रोजी होणार आहे. त्यानंतर 12 जानेवारी आणि 15 जानेवारी रोजी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा सामना कोलकाता आणि तिरुअनंतपुरम येथे होणार आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ -

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, अर्शदीप सिंग.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT