IND vs SL: 'आमची बॉडी लँग्वेजच पुरेशी...', कॅप्टन हार्दिकने श्रीलंकेला भरला दम

भारतीय संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याने टी20 मालिकेपूर्वी श्रीलंकेला धमकीवजा इशारा दिला आहे.
Hardik Pandya
Hardik PandyaDainik Gomantak
Published on
Updated on

India vs Sri Lanka, T20I: भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात मंगळवारपासून 3 सामन्यांची टी20 मालिका खेळवली जाणार आहे. आशिया चषक विजेते म्हणून भारत दौऱ्यावर येणाऱ्या श्रीलंका संघ भारतीय संघाला आव्हान देण्यास सज्ज आहे. पण असे असले तरी भारतीय संघाची देहबोलीच त्यांना धडकी भरवण्यास पुरेशी असल्याचे कर्णधार हार्दिक पंड्याने म्हटले आहे.

रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, श्रेयस अय्यर अशा अनेक प्रमुख खेळाडूंनी या टी20 मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी हार्दिक पंड्याकडे कर्णधारपद आणि सूर्यकुमार यादवकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. तसेच अनेक युवा क्रिकेटपटूंना संघात संधी देण्यात आली आहे.

Hardik Pandya
IND vs SL: भारत की श्रीलंका, टी20मध्ये कोण वरचढ? पाहा दोन्ही संघांची आमने-सामने कामगिरी

या टी20 मालिकेतील पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियम होणार आहे. या सामन्यापूर्वी हार्दिकने म्हटले आहे की 'आम्ही बदला वैगरे (आशिया चषकात झालेल्या पराभवाचा) घेण्याचा विचार केलेला नाही, पण आम्हाला चांगले क्रिकेट खेळायचे आहे. हो, आम्ही श्रीलंकेला आपण भारतात आहोत, याचा अनुभव देऊ. त्याबद्दल काळजी करू नका.'

'मी खात्री आणि वचन देतो की त्यांना आंतरराष्ट्रीय संघाबरोबर खेळत आहोत आणि तेही भारतीय संघाविरुद्ध भारतात, याचा अनुभव येईल. आम्हाला त्यांना स्लेज करण्याची गरज नाही, आमची देहबोलीच त्यांना थोडी धडकी भरवण्यात पुरेशी आहे. आणि मी वचन देतो आम्ही हे करू.'

Hardik Pandya
IND vs SL T20 Series: टीम इंडियाला ऋषभ पंतची उणीव भासेल का? हार्दिक म्हणाला...

भारताला गेल्यावर्षी आशिया चषकात श्रीलंकेविरुद्ध 6 विकेट्सने पराभव स्विकारावा लागला होता. त्या स्पर्धेत भारताला अंतिम सामन्यातही पोहोचता आले नव्हते.

दरम्यान, आमने-सामने कामगिरीबद्दल बोलायचे झाल्यास आत्तापर्यंत भारतात भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात 14 टी20 सामने झाले आहेत. यामध्ये 11 सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. तसेच 2 सामन्यात श्रीलंकेने विजय मिळवला आहे. त्याचबरोबर 1 सामन्याचा निकाल लागलेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com