Jasprit Bumrah Record Dainik Gomantak
क्रीडा

IND vs NZ Test: भेदक गोलंदाजी आणि नवा रेकॉर्ड! जसप्रीत बुमराहने रचला इतिहास; भारताच्या टॉप-10 कसोटी गोलंदाजांच्या लिस्टमध्ये एंट्री

Jasprit Bumrah Record: आपल्या पहिल्याच षटकात न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमला शून्यावर बाद करत त्याने पूर्व वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथ यांना मागे टाकले.

Manish Jadhav

Jasprit Bumrah Record: भारत-न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली असून, भारतीय कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय भारतीय गोलंदाजांनी अचूक ठरवत न्यूझीलंडच्या फलंदाजांना सुरुवातीलाच मोठे धक्के दिले.

या यशस्वी सुरुवातीचे संपूर्ण श्रेय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) जाते, ज्याने सुरुवातीच्या षटकांतच तीन महत्त्वाचे बळी टिपले. या कामगिरीसह बुमराहने एक ऐतिहासिक टप्पा गाठत भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या अव्वल दहा गोलंदाजांच्या यादीत स्थान मिळवले.

आपल्या पहिल्याच षटकात न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमला शून्यावर बाद करत त्याने पूर्व वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथ यांना मागे टाकले. बुमराहने 53 सामन्यांत 237 विकेट्स घेतल्या, तर श्रीनाथ यांनी 67 सामन्यांत 236 विकेट्स घेतल्या होत्या. भारतीय कसोटी गोलंदाजीच्या इतिहासात अनिल कुंबळे 619 विकेट्ससह अग्रस्थानी असून, आर. अश्विन 537 विकेट्ससह दुसऱ्या आणि कपिल देव 434 विकेट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

दीर्घ विश्रांतीनंतर कसोटी मैदानावर परतलेल्या बुमराहने पहिल्याच दिवशी आपला दबदबा निर्माण केला. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 आणि वनडे मालिकेतून त्याला कसोटीच्या तयारीसाठी विश्रांती देण्यात आली होती. लॅथमला बुमराहने टाकलेल्या भेदक इनस्विंगर चेंडूवर त्रिफळाचीत केले, ज्याचा अंदाज लॅथमला मुळीच आला नाही. त्यानंतरही बुमराहने आपल्या भेदक माऱ्याने किवी फलंदाजांना सळो की पळो करुन सोडले. त्याने डॅरिल मिशेलला अवघ्या एका धाव संख्येवर, तर टॉम ब्लंडेलला पाच धावांवर बाद करत न्यूझीलंडची अवस्था दयनीय केली. अशीच धारदार गोलंदाजी कायम राहिल्यास बुमराह भविष्यात अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर करु शकेल आणि या कसोटी मालिकेत त्याची भूमिका अत्यंत निर्णायक ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourist Touts: 'टाऊट्सची पाळेमुळे उखडून टाका'; ड्रग्ज, वेश्याव्यवसायातही सहभाग असल्याचा रोहन खंवटेंचा आरोप

Mukhyamantri Gharkul Scheme: गोव्यात मुख्यमंत्री घरकुल योजना डिसेंबरमध्ये सुरू; 100 फ्लॅट भाडेपट्टीवर मिळणार, 30 वर्षांच्या वास्तव्याची अट

Goa Politics: आरजीच्या जुन्या कार्यालयाच्या पत्त्यावर पत्रव्यवहार; वीरेश बोरकरांची मुख्य निवडणूक आयुक्तांना कायदेशीर नोटीस

Olive Ridley Turtles: कासव विणीच्या स्थळांचा प्रस्ताव मागे घ्या, अन्यथा... प्रशांत नाईक यांचा 19 डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम

Bihar Accident: रात्रीच्या काळोखात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! भरधाव स्कॉर्पियो नदीत कोसळून 6 जणांचा मृत्यू; अररियात काळाचा घाला VIDEO

SCROLL FOR NEXT