

पणजी: घर नसलेल्या गरजू गोमंतकीयांना हक्काचा निवारा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने आखलेल्या मुख्यमंत्री घरकुल योजनेला डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात प्रारंभ होण्याची शक्यता आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात किमान १०० एकखोली सदनिका (वन बीएचके फ्लॅट) उभारण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.
या योजनेला प्रारंभ झाल्यानंतर खासगी बांधकाम व्यावसायिकांना या प्रकल्पात सहभागी करून घेण्यासाठी निविदा जारी करण्यात येणार असल्याची माहिती गोवा गृहनिर्माण मंडळाचे अध्यक्ष जीत आरोलकर यांनी दिली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यापूर्वी विधानसभा अधिवेशनात या योजनेची घोषणा केली होती. प्रधानमंत्री आवास योजनेच्या धर्तीवर; परंतु गोव्याच्या परिस्थितीला अनुरूप अशी स्वतंत्र घरकुल योजना राबविण्याचा सरकारचा मानस आहे.
प्रत्येक तालुक्यात जमिनीची तरतूद
या योजनेची अंमलबजावणी केवळ काही शहरांपुरती मर्यादित न ठेवता संपूर्ण गोव्यात करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्यात सरकारकडून जमीन उपलब्ध करून दिली जाण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे उत्तर आणि दक्षिण गोव्यातील विविध तालुक्यांमध्ये टप्प्याटप्प्याने घरकुल प्रकल्प उभारण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.
...यांना मिळणार योजनेचा लाभ
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने गोव्यात किमान ३० वर्षे वास्तव्य केल्याचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे. शिवाय लाभार्थी निवडीसाठी कठोर पात्रता निकष निश्चित केले जात आहेत. स्वतःच्या मालकीचे घर नसलेल्या आणि खरोखरच निवाऱ्याची गरज असलेल्या गोमंतकीयांनाच या योजनेचा लाभ मिळावा, यावर सरकारचा भर आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.