Goa Tourist Touts: 'टाऊट्सची पाळेमुळे उखडून टाका'; ड्रग्ज, वेश्याव्यवसायातही सहभाग असल्याचा रोहन खंवटेंचा आरोप

Goa Police Action Against Touts: राज्‍यात कार्यरत असलेले टाऊट्स हे गोव्‍याबाहेरील असून, ते अनेक व्‍यवसायांत गुंतलेले आहेत.
Goa Police Action Against Touts
Goa Tourist ToutsDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: राज्‍यात कार्यरत असलेले टाऊट्स हे गोव्‍याबाहेरील असून, ते अनेक व्‍यवसायांत गुंतलेले आहेत. त्‍यांच्‍यामुळे गोव्‍याच्‍या संस्‍कृतीला हानी पोहोचत आहे. त्‍यामुळे गोवा पोलिसांनी अशा टाऊट्सची पाळेमुळे उखडून काढणे आवश्‍‍यक आहे, असे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पर्यटन हंगाम सुरू होताच सक्रिय झालेल्‍या टाऊट्सविरोधात यावर्षीही शेकडो तक्रारी दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी मंत्री खंवटे यांना छेडले असता ते म्‍हणाले, आपण २०२२ पासूनच टाऊट्ससंदर्भात बोलत असून, त्‍यांचा विरोध करत आहे. राज्‍यात कार्यरत असलेले टाऊट्स गोव्‍यातील नसून, इतर राज्‍यांतील आहेत. ते केवळ तिकीट विक्रीच करीत नाहीत तर ड्रग्‍स, वेश्‍‍याव्‍यवसातही गुंतलेले आहेत. त्‍यांच्‍यामुळे गोव्‍याच्‍या संस्‍कृतीला धक्‍का पोहोचत आहे.

Goa Police Action Against Touts
Goa Politics: आरजीच्या जुन्या कार्यालयाच्या पत्त्यावर पत्रव्यवहार; वीरेश बोरकरांची मुख्य निवडणूक आयुक्तांना कायदेशीर नोटीस

त्‍यामुळे हा विषय मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्‍याकडेही उपस्‍थित केला होता. शिवाय पोलिस महासंचालक आणि उत्तर गोवा पोलिस अधीक्षकांकडेही टाऊट्सचे जाळे कायमस्‍वरुपी नष्‍ट करण्‍याची मागणी आपण केलेली आहे, असे ते म्‍हणाले.

कळंगुट येथील ‘सरकार तुमच्‍या दारी’ कार्यक्रमातही बहुतांशी स्‍थानिकांच्‍या तक्रारी टाऊट्सबाबतच होत्‍या. त्‍यामुळे राज्‍यात कार्यरत असलेल्‍या टाऊट्सवर कडक कारवाई करण्‍यासह त्‍यांच्‍या म्‍होरक्‍यांचा शोध घेण्‍याची आणि हा व्‍यवसाय कायमस्‍वरुपी बंद करण्‍याची जबाबदारी पोलिसांची आहे, असेही मंत्री खंवटे यांनी नमूद केले.

Goa Police Action Against Touts
Goa Cancer Research: कर्करोगाच्या कारणांचा शोध घेण्यासाठी गोवा सरकारचा मोठा निर्णय; 'गोवा केअर्स'साठी 31 कर्मचाऱ्यांची भरती

दर वाढवलेल्‍या एजन्‍सीचे होणार निलंबन

पे-पार्किंगचे कंत्राट मिळालेल्‍या एजन्‍सीने पार्किंगचा दर प्रदर्शित करणे महत्त्‍वाचे आहे. कळंगुटमध्‍ये नेमण्‍यात आलेल्‍या एका एजन्‍सीने दर वाढवल्‍याची तक्रार स्‍थानिक आमदार मायकल लोबो यांनीही केली होती. त्‍यानुसार संबंधित एजन्‍सीला ‘कारणे दाखवा’ नोटीस जारी करण्‍यात आली असून, लवकरच तिचे निलंबनही करण्‍यात येईल, असेही मंत्री खंवटे यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.