IND vs NZ Test Series: न्यूझीलंडच्या भूमीवर टीम इंडियाचा चिंता वाढवणारा कसोटी रेकॉर्ड, 58 वर्षांत केवळ 2 मालिका विजय; गिल सेनेपुढे इतिहास बदलण्याचे मोठे आव्हान

India vs New Zealand Test Series 2026: भारत-न्यूझीलंड यांच्यातील टी-20 आणि एकदिवसीय मालिका संपल्यानंतर आता दोन्ही संघांमध्ये रोमांचक कसोटी मालिकेचा थरार पाहायला मिळणार आहे.
India vs New Zealand Test Series 2026
Team IndiaDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

India vs New Zealand Test Series 2026: भारत-न्यूझीलंड यांच्यातील टी-20 आणि एकदिवसीय मालिका संपल्यानंतर आता दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिकेचा थरार पाहायला मिळणार आहे. भारत-न्यूझीलंड यांच्यातील या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेची सुरुवात गुरुवार (19 नोव्हेंबर) पासून होत आहे. मालिकेतील पहिला सामना न्यूझीलंडमधील प्रसिद्ध वेलिंगटनच्या बेसिन रिझर्व्ह मैदानावर खेळवला जाईल. घरच्या मैदानावर भारतावर आपला दबदबा कायम ठेवण्यासाठी किवी संघ पूर्णपणे सज्ज आहे.

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-27 च्या पॉइंट्स टेबलमध्ये सध्या न्यूझीलंडचा संघ पहिल्या स्थानी आहे. टॉम लॅथमच्या नेतृत्वाखाली खेळणारा किवी संघ भारताविराधात घरच्या मैदानावर आपला विजयी साखळी कायम ठेवण्यासाठी मैदानात उतरणार आहे. न्यूझीलंडने भारताविरोधात (India) घर आणि बाहेर अशा दोन्ही ठिकाणी त्यांचे मागील तिन्ही कसोटी सामने जिंकले आहेत. या मालिकेसाठी न्यूझीलंडने आपला पूर्ण ताकदीचा संघ जाहीर केला आहे. याउलट, भारतीय संघात निवडलेल्या 16 खेळाडूंपैकी केवळ 3 असे खेळाडू आहेत, ज्यांना न्यूझीलंडमध्ये कसोटी सामना खेळण्याचा अनुभव आहे.

India vs New Zealand Test Series 2026
Team India ODI Series: 2027 वनडे वर्ल्ड कपआधी टीम इंडियाची अग्निपरीक्षा! न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिकेसह 'या' संघांविरुद्ध होणार सामने; पाहा संपूर्ण वेळापत्रक

भारतीय संघाने 1968 च्या सुरुवातीला पहिल्यांदा न्यूझीलंडचा दौरा केला होता. तेव्हापासून आतापर्यंत भारताने तिथे एकूण 10 कसोटी मालिका खेळल्या आहेत, त्यापैकी फक्त दोनदा भारताने मालिका आपल्या नावावर केल्या आहेत. नवाब मन्सूर अली खान पतौडी यांच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्याच दौऱ्यावर 3-1 ने मालिका जिंकून इतिहास रचला होता. त्यानंतर दुसरी मालिका जिंकण्यासाठी भारताला तब्बल 41 वर्षे वाट पाहावी लागली, जी 2009 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली शक्य झाली.

India vs New Zealand Test Series 2026
Team India World Record: टीम इंडियाचा 'भीमपराक्रम'! टी-20 क्रिकेटमध्ये 200 सामने जिंकणारा भारत ठरला जगातील पहिलाच संघ; रोमहर्षक सामन्यात जपानचा पराभव

गेल्या 68 वर्षांत भारतीय संघाने न्यूझीलंडच्या भूमीवर एकूण 25 कसोटी सामने खेळले असून, त्यापैकी केवळ 5 सामन्यांत त्यांना विजय मिळाला. यातील 3 सामने भारताने 1968 च्या पहिल्याच दौऱ्यात जिंकले होते. या शतकाच्या सुरुवातीपासून भारताने तिथे 9 कसोटी सामने खेळले असून, त्यात केवळ 1 विजय मिळाला, तर 5 सामन्यांत पराभव पत्करावा लागला. मागील दौऱ्यावर भारताला क्लीन स्वीपचा सामना करावा लागला होता, त्यामुळे यंदा भारतीय संघासमोर मोठे आव्हान असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.