Kapil Dev|Jairam Ramesh|BCCI Dainik Gomantak
क्रीडा

Kapil Dev: "बिशन सिंग बेदींप्रमाणेच..." कपिल देव यांना फायनलला न बोलावल्याने जयराम रमेश संतापले

BCCI: "त्यांनी मला बोलावले नाही म्हणून मी गेलो नाही. हे इतकेच सोपे आहे. मला 1983 च्या संपूर्ण संघाला माझ्यासोबत सामना पाहायला असणे आवडले असते."

Ashutosh Masgaunde

Jairam Ramesh lashed out at BCCI for not inviting Kapil Dev to the Cricket World Cup final:

भारताला पहिल्यांदा विश्वविजेतेपदाची चव चाखवणारे माजी कर्णधार कपिल देव यांनी दावा केला की, यजमान संघ आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील विश्वचषक फायनलसाठी मला आमंत्रित करण्यात आले नव्हते.

1983 मध्ये भारताला पहिले एकदिवसीय विश्वचषक विजेतेपद मिळवून देणाऱ्या कपिल देव यांनी सांगितले की, त्यांना त्यांच्या विश्वविजेत्या संघातील सहकाऱ्यांसोबत सामन्याला जायचे होते.

या प्रकरणावर नाराजी व्यक्त करत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी हे अस्वीकार्य आणि चुकीचे असल्याचे म्हणत फटकारले.

त्यांनी ट्विट केले की, "अहमदाबाद येथे होणाऱ्या विश्वचषकाच्या फायनलसाठी बीसीसीआयने कपिल देव यांना आमंत्रित केले नाही हे पूर्णपणे अस्वीकार्य आहे. बेदींप्रमाणेच कपिल देवही खुलेपणाने आपले मत मांडण्यासाठी ओळखले जातात आणि काही महिन्यांपूर्वी त्यांनी आंदोलक महिला कुस्तीपटूंना उघडपणे पाठिंबा दिला होता."

तत्पूर्वी, कपिल यांनी पत्रकाराशी बोलताना सांगितले की, "मला तेथे आमंत्रित करण्यात आले नव्हते. त्यांनी मला बोलावले नाही म्हणून मी गेलो नाही. हे इतकेच सोपे आहे. मला 1983 च्या संपूर्ण संघाला माझ्यासोबत सामना पाहायला असणे आवडले असते परंतु मला वाटते की, ही एक मोठी स्पर्धा आहे आणि लोक जबाबदाऱ्यांमध्ये इतके व्यस्त आहेत की कधीकधी ते विसरतात."

नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या माजी भारतीय कर्णधारांमध्ये सौरव गांगुलीचा समावेश होता. त्याला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (BCCI) माजी अध्यक्ष म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. बीसीसीआयचा नियम आहे की, ते माजी अध्यक्ष आणि अधिकाऱ्यांना आमंत्रित करतात.

हा सामना पाहण्यासाठी शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांसारखे बॉलिवूडचे बडे सेलिब्रिटी उपस्थित होते. दिग्गज बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोणही यावेळी स्टँडमध्ये उपस्थित होते.

"भाजप क्रिकेटलाही सोडणार नाही"

शिवसेना नेते संजय राऊत यांनी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यावरून यापूर्वी बीसीसीआय सह सत्ताधारी भाजपला फटकारले होते.

राऊत म्हणाले, भाजपला राजकीय कार्यक्रम आयोजित करायचा असल्यामुळे क्रिकेट मुंबईहून गुजरातमधील अहमदाबादमध्ये हलवण्यात आले. यापूर्वी मुंबईला क्रिकेटमध्ये देशाचे पारंपरिक केंद्र म्हटले जायचे.

राऊत यांनी दावा केला, “पूर्वी मुंबई ही क्रिकेटची ‘मक्का’ होती. असे सर्व महत्त्वाचे सामने पूर्वी दिल्ली, मुंबई किंवा कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर आयोजित केले जायचे. संपूर्ण क्रिकेट मुंबईहून अहमदाबादला हलवण्यात आले कारण त्यांना राजकीय कार्यक्रम करायचा होता. राजकीय फायद्यासाठी भाजप क्रिकेटलाही सोडणार नाही," असा आरोप राऊत यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Omkar Elephant: 'ओंकार हत्ती' गोव्याच्या महामार्गावर! वाहतूक ठप्प; तोर्सेत पाडला बांबूचा फडशा

Mapusa Roads: नेहमीचीच रड! कोट्यवधी खर्चून डांबरीकरण केले, ते पावसात गेले वाहून; चतुर्थी उलटून गेली तरी म्हापशातील रस्ते 'जैसे थे'

PM Modi Birthday: "हॅपी बर्थडे, फ्रेंड", पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाला ट्रम्पचा फोन

Water Metro Goa: 'वॉटर मेट्रो'साठी पथक गोव्यात दाखल! करणार जलमार्गांचा अभ्यास; मांडवीच्या पात्राची तपासणी

Mapusa: भंगार वेचण्याच्या बहाण्याने आल्या, 'स्क्रू-ड्रायव्हर' घेऊन घुसल्या घरात; म्हापशात चोरीचा डाव उधळला; एका महिलेला अटक

SCROLL FOR NEXT