CWC Final 2023: ग्राउंडवर घुसत कोहलीला पकडणाऱ्या ऑस्ट्रेलियन तरुणाला खलिस्तानी दहशतवादी संघटनेकडून 10 हजार डॉलर्सचे बक्षीस

Australian Pitch Invader: विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यादरम्यान सुरक्षेत मोठी त्रुटी दिसून आली. एका पॅलेस्टाईन समर्थकाने अचानक मैदानात घुसून विराट कोहलीच्या जवळ जाऊन त्याला मागून पकडले.
Australian Pitch Invader WEN Johnson
Australian Pitch Invader WEN JohnsonDainik Gomantak

Khalistani terrorist organization SJI declares $10,000 reward to Australian WEN Johnson who caught Kohli entering the ground in world Cup final:

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी झालेल्या क्रिकेट विश्वचषकाच्या फायनलमध्ये सुरक्षेतील त्रुटींचा मुद्दा चांगलाच तापला आहे. सायंकाळी उशिरा आरोपी ऑस्ट्रेलियन नागरिकाविरुद्ध चांदखेडा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

सामन्यात भारताची फलंदाजी सुरू असताना हा तरुण विराट कोहलीपर्यंत पोहोचला होता. त्याच्या टी-शर्टवर 'फ्री पॅलेस्टाईन' असे लिहिले होते. आता प्रतिबंधित खलिस्तानी दहशतवादी संघटना शीख फॉर जस्टिसने या प्रकरणात उडी घेतली आहे.

विश्वचषकाच्या अंतिम सामन्यादरम्यान एका पॅलेस्टाईन समर्थकाने अचानक मैदानात घुसून विराट कोहलीच्या जवळ जाऊन त्याला मागून पकडले. वेन जॉन्सन असे या तरुणाचे नाव असून, तो ऑस्ट्रेलियाचा रहिवासी असल्याचे सांगण्यात आले.

जॉन्सन 'फ्री पॅलेस्टाईन' टी-शर्ट घालून मैदानावर पोहोचला. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जॉन्सन म्हणाला की, मी ऑस्ट्रेलियाचा आहे. विराट कोहलीला भेटण्यासाठी मी मैदानावर पोहोचलो होतो. हा निषेध पॅलेस्टाईनमधील युद्धाबाबत आहे.

खलीस्तानी दहशतवादी संघटनेकडून 10 डॉलर्सचे बक्षीस

शीख फॉर जस्टिस संघटनेचा प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू याने ऑस्ट्रेलियन नागरिक वेन जॉन्सनला 10 हजार डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले आहे.

एका व्हिडिओमध्ये पन्नूने भारताविरुद्ध विषही ओकले असून, खलिस्तानचे समर्थन केले आहे. तो म्हणाला की, मैदानात घुसून जॉन्सनने गाझा आणि पॅलेस्टाईनबाबत भारताची भूमिका उघड केली आहे. यासाठी आम्ही जॉन्सनला 10 हजार डॉलर्सचे बक्षीस देणार आहे. आम्ही जॉन्सनच्या पाठीशी आहोत. यावेळी पन्नूने खलिस्तान आणि पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ घोषणाबाजीही केली.

पन्नूकडून सतत धमकीचे व्हिडिओ

पन्नूने धमकीचा व्हिडिओ जारी करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी ऑक्टोबरमध्ये पन्नू याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धातून धडा घेण्याची धमकी दिली होती.

यूएस-आधारित शिख फॉर जस्टिस (SFJ) संघटनेचा बंदी घातलेले प्रमुख पन्नू म्हणाला होता की, पंजाबपासून पॅलेस्टाईनपर्यंत, बेकायदेशीर व्यवसायातील लोक प्रतिक्रिया देतील आणि हिंसाचार हिंसाचाराला जन्म देईल.

सप्टेंबरमध्ये, भारत-पाकिस्तान ICC विश्वचषक 2023 सामन्यापूर्वी धमक्या दिल्याबद्दल आणि शत्रुत्वाला प्रोत्साहन दिल्याबद्दल पन्नू विरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com