Mumbai Local : मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी खुली

राज्य शासनाने कोरोनाचे निर्बंध हटविल्यावर रेल्वेने प्रशासनाचा मुंबई लोकल सुरू करायला अखेर हिरवा कंदील
Local Railway
Local RailwayDainiok Gomantak

Mumbai local trains : राज्य सरकार कडून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कोरोनाचे लावण्यात आलेले सर्व निर्बंध हटवत असल्याचे मुख्यंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केलं. त्यानंतर राज्यातील उरलं सुरलेलं जनजीवन ही रूळावर आले. त्यानंतर रूळावरून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी आनंदाची दुसरी बातमी आली आहे. आता मुंबईकर असो किंवा नसो तो प्रत्येक व्यक्ती लोकलने प्रवास करू शकतो. याबाबत, रेल्वेने प्रशासनाने सांगितले की, त्यांनी लसीकरणाशी संबंधित पर्याय आपल्या तिकीट अॅपमधून हटविला आहे. आतापर्यंत, केवळ पूर्ण लसीकरण झालेल्या नागरिकांनाच लोकल ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी होती. मात्र आता निर्बंध हटविल्यामुळे तिकीट अॅपमधूनदेखील लसीकरणाशी संबंधित पर्याय हटविण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या प्रवासाचा प्रश्न मार्गी लागला आहे. त्यामुळे प्रवाश्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. (Railway Administration has announced that the Mumbai local trains will open to citizens of Mumbai)

राज्य सरकारच्या निर्देशांनुसार कोरोनाचे सर्व निर्बंध हटविण्यात आल्यानंतर मुंबई लोकलसाठी रेल्वे (Railways) प्रशासनाने तिकीट अॅपमधून लसीकरणाशी संबंधित पर्याय हटविला आहे. त्यामुळे आता प्रवाशांना लस प्रमाणपत्रे तिकीट अॅपशी लिंक करण्याची आवश्यकता नाही. तर कोरोना बाबतच्या सर्व सर्व सूचना आता मागे घेण्यात आल्याचे रेल्वेच्या प्रवक्त्याने सांगितले आहे.

दरम्यान, प्रवाशांना लस प्रमाणपत्रे तिकीट अॅपशी लिंक करण्याच्या नियमाविरोधात नागरिकांच्या एका गटाने उच्च न्यायालयातही (High Court) दाद मागितली होती. त्यावरून न्यायालयाने राज्य सरकारवर ताशोरे ओढत भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले होते.

रेल्वेचा होणारा तोटा थांबला

कोरोनामुळे रेल्वेने प्रवाशांवर अनेक बंधने घातली होती. ज्यामुळे सुखर रेल्वे प्रवास होत नव्हता. मात्र आता राज्य सरकारकडून कोरोनाचे सर्व निर्बंध हटविण्यात आल्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. आता मुंबईची लोकल (Mumbai local) सर्वांसाठी खुली झाल्याने त्याचा फायदा रेल्वेलाही होणार आहे. ज्यामुळे रेल्वेचा होणारा तोटा थांबणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com