J. P. Atreya Karandak  Dainik Gomantak
क्रीडा

Cricket Tournament: गोव्याच्या स्नेहल, सिद्धेशचा जबदरस्त धडाका

पावसामुळे सामना अर्धवट, मात्र गोव्याची फलंदाजीत चमक

दैनिक गोमन्तक

पणजी: पंजाबमधील मोहाली येथे पावसामुळे जे. पी. अत्रेय करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतील (ODI Cricket Tournament) गोव्याचा प्लेयर्स अकादमी दिल्लीविरुद्धचा सामना अर्धवट राहिला, मात्र फलंदाजीची संधी साधताना स्नेहल कवठणकर आणि मुंबईकर ‘पाहुणा’ सिद्धेश लाड यांनी जबरदस्त धडाका प्रदर्शित केला.

J. P. Atreya Karandak ODI Cricket Tournament Goa Players Academy played

स्नेहलने 79 चेंडूंत 4 चौकार व 6 षटकारांच्या मदतीने नाबाद 90 धावा केल्या. सिद्धेशनेही आक्रमक फलंदाजी केली. त्याने अवघ्या 55 चेंडूंत 7 चौकार व 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 80 धावा केल्या. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 149 धावांची अभेद्य भागीदारी केली. त्यामुळे गोव्याने प्रथम फलंदाजी करताना 33 षटकांत 2 बाद 227 धावा केल्या. त्यानंतर दिल्लीच्या (Delhi )संघाची 9 षटकांत 3 बाद 62 अशी स्थिती असताना सामना पावसामुळे रद्द करावा लागला.

वारंवार पावसाचा अडथळा आलेल्या या सामन्यात गोव्याने कर्णधार अमोघ देसाई (3) याला लवकर गमावले. त्यानंतर स्नेहलने कश्यप बखले (39) याच्यासमवेत दुसऱ्या विकेटसाठी 61 धावांची भागीदारी केली. कश्यप बाद झाल्यानंतर सिद्धेशने स्नेहलच्या साथीत दिल्लीतील अकादमी गोलंदाजांवर जोरदार हल्ला चढविला. गोव्याचा स्पर्धेतील पुढील सामना पेट्रोलियम क्रीडा मंडळाविरुद्ध खेळला जाईल.

संक्षिप्त धावफलक

गोवा क्रिकेट असोसिएशन : 33 षटकांत 2 बाद 227 (अमोघ देसाई 3, स्नेहल कवठणकर नाबाद 90, कश्यप बखले 39, सिद्धेश लाड नाबाद 80, अर्जुन राप्रिया 1-49, यशजीत 1-27) विरुद्ध प्लेयर्स अकादमी इलेव्हन दिल्ली : 9 षटकांत 3 बाद 62 (सनत सांगवान 24, वेदांश सिओतिया 18, अर्जुन तेंडुलकर 3-0-26-0, शुभम तारी 3-0-21-1, फेलिक्स आलेमाव 2-0-8-2, अमित यादव 1-0-3-0).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: रेल्वे ट्रॅकवर फसली 'थार'; नागालँडच्या राजधानीतला व्हिडिओ व्हायरल Watch

Talpan: तळपणची समुद्री गस्तीबोट नादुरुस्त, किनारी सुरक्षा पोलिसांची व्यथा; नवीन बोटीची मागणी

Nuvem: नुवे भागातील शेतकऱ्यांना पाण्याचे पंप वितरित, माजी आमदार विल्फ्रेड डिसा यांचा उपक्रम : भाजी लागवडीसाठी प्रोत्साहन

Karnataka Lalbagh Mango: कर्नाटकातील 'लालबाग' आंबा डिचोलीच्या बाजारपेठेत दाखल, किलोचा दर 200 रुपये

ZP Election 2025: सावर्डेत मोहन, आतिष यांच्यात थेट लढत; आरजी, काँग्रेस रिंगणात, आमदार गणेश गावकर यांची प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT