Luca Nardi - Novak Djokovic | Indian Wells 2024
Luca Nardi - Novak Djokovic | Indian Wells 2024 AFP
क्रीडा

Novak Djokovic: 'आतापर्यंत मला कोणी ओळखत नव्हतं, पण...', जोकोविचला पराभूत करणारा 20 वर्षीय नार्दी भलताच खूश

Pranali Kodre

Luca Nardi beat Novak Djokovic in third round of ATP Indian Wells Masters

इंडियन वेल्स ओपन 2024 टेनिस स्पर्धेत इटलीच्या 20 वर्षीय ल्युका नार्दीने जागतिक क्रमावरीत अव्वल क्रमांकावर असेलल्या नोवाक जोकोविचला पराभवाचा मोठा धक्का दिला आहे. सोमवारी रात्री (11 मार्च) झालेल्या तिसऱ्या फेरीच्या सामन्यात नार्दीने पाच वेळच्या इंडियन वेल्स विजेत्या जोकोविचला 6-4, 3-6, 6-3 अशा फरकाने पराभूत केले.

ज्यावेळी जागतिक क्रमवारीत 123 क्रमांकावर असलेल्या नार्दीने 24 ग्रँडस्लॅम विजेत्या जोकोविचविरुद्ध विजयावर शिक्कामोर्तब केले त्यावेळी त्यालाही स्वत:वर विश्वास बसत नव्हता. नार्दी जोकोविचला आदर्श मानत आला आहे. त्याचमुळे त्याच्याचविरुद्ध विजय मिळवणे हे त्याच्यासाठी स्वप्नवत होते.

एटीपी मास्टर्स 1000 किंवा ग्रँड स्लॅमसारख्या स्पर्धेत जोकोविचला पराभूत करणारा नार्दी सर्वात निचांकी क्रमवारी असलेला खेळाडू ठरला आहे. त्याने केविन अँडरसनच्या विक्रमाला मागे टाकले आहे. अँडरसनने 2008 मध्ये 122 व्या क्रमांकावर असताना मियामी ओपनमध्ये जोकोविचला पराभूत केले होते.

नार्दीने या सामन्यात जोकोविचविरुद्ध आक्रमक खेळ केला होता. त्यामुळे त्याने संपूर्ण सामन्यात जोकोविचला सतवले. दरम्यान, 2019 नंतर पहिल्यांदाच जोकोविच इंडियन वेल्स खेळत होता.

विशेष म्हणजे नार्दी खरंतर इंडियन वेल्सच्या मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरत नव्हता. परंतु, मुख्य स्पर्धेत खेळणारा खेळाडू दुखापतीमुळे बाहेर झाल्याने अचानक नार्दीकडे ही स्पर्धा खेळण्याची संधी चालून आली. त्यानेही ही संधी दोन्ही हातांनी झेलत उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.

जोकोविचला पराभूत केल्यानंतर नार्दी म्हणाला, 'मला वाटते या रात्रीआधी कोणीही मला ओळखत नव्हते. मला आशा आहे की प्रेक्षकांनी सामन्याचा आनंद घेतला असेल. मी या विजयाने खूप खुश आहे.'

'मला माहित नाही, हे कसे झाले. मला वाटते हा चमत्कार आहे. कारण मी 20 वर्षांचा मुलगा आहे आणि क्रमवारीत 100 पेक्षा जास्त आहे आणि मी नोवाक जोकोविचला हरवलंय. हे अनपेक्षित आहे.'

दरम्यान आता उपउपांत्यपूर्व फेरीत नार्दीचा सामना टॉमी पॉलविरुद्ध बुधवारी (13 मार्च) होणार आहे. तसेच नार्दी आता क्रमवारीत पहिल्या १०० खेळाडूंमध्ये येणार आहे. तो 96 व्या क्रमांकावर आता पोहचू शकतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vegetable Prices Update: राज्यात फळभाज्यांचे दर भडकले, लसूण 320 रुपये किलो; सर्वसामान्यांना महागाईचे चटके

Blue Origin Flight: ऐतिहासिक! राकेश शर्मानंतर गोपीचंद थोटाकुरा ठरले अंतराळात जाणारे दुसरे भारतीय

Holy Spirit Feast In Margao: होली स्पिरिट चर्चच्या फेस्ताची सुरवात; मडगाव पालिकेचे 35 लाख महसुलाचे लक्ष्य

Egg Prices Increased: गोव्यात मासळीपाठोपाठ आता बॉयलर अंड्यांचे भाव गगनाला भिडले; दरातील चढउतार सुरूच

Kushavati River: केपेतील ‘कुशावती’चे पाणी प्रदूषित; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात!

SCROLL FOR NEXT