Novak Djokovic - Virat Kohli Friendship:
सार्बियाचा टेनिस स्टार नोवाक जोकोविचने काही दिवसांपूर्वीच सांगितले होते की तो आणि भारताचा क्रिकेटपटू विराट कोहली एकमेकांना मेसेज करत असतात. त्यानंतर विराटने त्यांच्यात मैत्री कशी झाली, याबद्दल खुलासा केला होता. आता या खुलाश्यानंतर जोकोविचने केलेलं ट्वीट चर्चेत आले आहे.
विराटने बीसीसीआयशी बोलताना सांगितले होते की त्याने सहज इंस्टाग्रामवर जोकोविचला हॅलो असा मेसेज केला होता, त्यानंतर त्यांच्यात संवाद सुरु झाला आणि मैत्री झाली. याशिवाय विराटने असेही सांगितले होते की त्यांच्यात एकमेकांनी मिळवलेल्या यशाबद्दल आदर आणि कौतुक आहे.
यानंतर आता बीसीसीआयच्या ट्वीटवर उत्तर देताना जोकोविचने लिहिले की 'विराट कोहली तू केलेल्या कौतुकाबद्दल आभार. आपण एकत्र खेळण्याची मी वाट पाहात आहे.'
खंरतर विराट आणि जोकोविच यांच्यात गेल्या काही वर्षापासून मैत्री आहे, मात्र याबद्दल फार कोणाला माहिती नव्हते. पण काही दिवसांपूर्वीच सोनी स्पोर्ट्सशी बोलताना जोकोविचने याबद्दल उल्लेख केल्यानंतर विराटनेही त्याबद्दल भाष्य केले. त्यामुळे सर्वांना त्याच्यात असलेल्या मैत्रीबद्दल माहिती झाली.
दरम्यान, दोघंही अद्याप मेसेजवरच बोलतात, त्यांना अजून प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळाली नसल्याचेही विराटने सांगितले होते.
विराटने बीसीसीआयशी बोलाताना सांगितले की 'मी एकदा इंस्टाग्रामवर त्याचे प्रोफाईल पाहात होतो आणि मी सहज मेसेजचं बटण दाबलं, मला वाटतं मी हॅलो वैगरे म्हटलो असेल. नंतर माझ्या डीएमवर त्याचा मेसेज आला होता.'
त्याचबरोबर तसेच विराटने असेही सांगितले की पहिल्यांदा जोकोविचचा मेसेज आला तेव्हा ते खोटं अकाऊंट वैगरे असेल, असे वाटले होते, मात्र खरोखरंच जोकोविचने मेसेज केला होता. त्यानंतरच ते एकमेकांशी बोलायला लागले.
याशिवाय विराटने अशीही आशा व्यक्त केली होती की तो लवकरच जोकोविचला भेटेल.
दरम्यान, आता या दोन दिग्गज खेळाडूंनी त्यांच्यातील मैत्रीचा खुलासा केल्यानंतर चाहत्यांमध्ये त्यांना एकत्र पाहाण्याती उत्सुकता दिसून येत आहे. तसेच चाहते त्यांना मैदाना एकत्र पाहाण्यासाठी उत्सुक आहेत.
सध्या विराट अफगाणिस्तानविरुद्ध टी20 मालिका खेळण्यात व्यस्त आहे. तसेच जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपन 2024 स्पर्धा खेळत आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.