Novak Djokovic
Novak DjokovicAFP

Novak Djokovic: बापरे! तब्बल 5 वर्षानंतर जोकोविच ऑस्ट्रेलियात पराभूत, 24 वर्षीय खेळाडूचा धक्कादायक विजय

Alex de Minaur: नोवाक जोकोविचला 2018 नंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात पराभवाचा धक्का बसला.
Published on

Alex de Minaur stuns Novak Djokovic at United Cup:

ऑस्ट्रेलियाच्या टेनिस संघाने पहिल्यांदाच युनायटेड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. ऑस्ट्रेलियाने मायदेशात सार्बियाच्या बलाढ्य संघाला पराभूत केले. यादरम्यान ऑस्ट्रेलियाच्या ऍलेक्स डी मिनौरने जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावरील नोवाक जोकोविचला पराभूत करत धक्कादायक विजय नोंदवला.

बुधवारी (3 जानेवारी) ऍलेक्सने 94 मिनिटे चाललेल्या सामन्यात जोकोविचला 6-4, 6-4 अशा फरकाने पराभवाचा धक्का दिला. त्यामुळे जोकोविचची ऑस्ट्रेलियातील सलग 43 विजयांची साखळी अखेर तुटली. तो 2018 नंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियामध्ये खेळताना पराभूत झाला.

Novak Djokovic
Rafael Nadal: नदाल इज बॅक! 349 दिवसांनी खेळलेल्या पहिल्याच एकेरी सामन्यात रोमहर्षक विजय

जोकोविचला 2018 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये अखेरीस हायन चंगने पराभूत केले होते. जोकोविचने गेल्या 5 वर्षात ऑस्ट्रेलियात 4 ऑस्ट्रेलियन ओपन, 1 एटीपी कप, 1 ऍडलेड इंटरनॅशनल या स्पर्धा जिंकल्या आहेत.

दरम्यान, बुधवारी जोकोविचच्या मनगटात वेदना जाणवल्या होत्या, ज्यावर त्याने सामन्यादरम्यान उपचारही घेतले. पण अखेर 24 वर्षीय ऍलेक्सने त्याच्याविरुद्ध सर्वोत्तम खेळ करताना विजयाची नोंद केली.

Novak Djokovic
Novak Djokovic vs Carlos Alcaraz: 20 वर्षांच्या अल्कारेजने हरवल्यावर जोकोविच म्हणतोय, 'त्याच्याकडे फेडरर, राफा अन् माझे...'

या विजयाबद्दल बोलताना ऍलेक्स म्हणाला, 'खूप खास विजय. नोवाक नेहमीच शानदार प्रतिस्पर्धी राहिला आहे. त्याने खेळासाठी जे केले आहे, ते खूप विशेष आहे. खूप मस्त, शानदार वाचत आहे आणि मला पर्थ, ऑस्ट्रेलियामध्ये हा विजय मिळवल्याचा आनंद आहे.'

दरम्यान, युनायडेट कपच्या उपांत्यपूर्व फेरीत ऍलेक्सनंतर ऑस्ट्रेलियाच्या आयला टॉम्लयानोविकनेही सार्बियाच्या नातालिया स्टेवानोविकविरुद्ध 6-1, 6-1 असा विजय मिळवला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने 2-0 अशी आघाडी घेत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com