Spanish football player Edu Bedia Dainik Gomantak
क्रीडा

FC Goa : एदू बेदिया एफसी गोवाच्या करारातून मुक्त; सहा मोसमांत 122 सामने

किशोर पेटकर

ISL 2023-24: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत सलग सहा मोसम खेळलेल्या अनुभवी स्पॅनिश मध्यरक्षक एदू बेदिया याला एफसी गोवा संघाने रविवारी करारमुक्त केले.

मैदानावरील भरीव योगदान, अतूट बांधिलकी यामुळे गोव्यातील फुटबॉलप्रेमींत लोकप्रिय ठरलेल्या 34 वर्षांच्या खेळाडूंने सर्व स्पर्धांत मिळून 122 सामन्यांत प्रतिनिधित्व केले.

१५ जानेवारी २०२३ रोजी आयएसएल स्पर्धेत बेदिया १००वा सामना खेळला. स्पर्धेच्या इतिहासात एकाच क्लबतर्फे हा टप्पा गाठणारा पहिला परदेशी फुटबॉलपटू हा पराक्रम त्याच्या नावे नोंदीत झाला. बेदियाने २०१७ ते २०२३ या कालावधीत एफसी गोवासाठी कितीतरी विक्रम नोंदविले, तसेच संस्मरणीय कामगिरीही साधली.

तो संघात असताना एफसी गोवाने २०१९-२० मध्ये लीग विनर्स शिल्डचा मान मिळविला. २०१९ मध्ये सुपर कप, तर २०२१ मध्ये ड्युरँड कप विजेतेपद प्राप्त केले. शिवाय २०१८-१९ मध्ये आयएसएल उपविजेतेपद पटकावले, तर २०२१ मधील एएफसी चँपियन्स लीगमध्येही गोव्यातील संघाचे प्रतिनिधित्व केले.

अतूट निष्ठा आणि समर्पित वृत्ती

‘‘सहा वर्षांच्या कालावधीत बेदिया एफसी गोवासाठी विलक्षण ठरला. त्याने संघाप्रती अतूट निष्ठा आणि समर्पित वृत्ती प्रदर्शित करताना संघासोबत एकत्रितपणे चढउतार अनुभवले,’’ असे स्पॅनिश मध्यरक्षकाचा गौरव करताना एफसी गोवाचे फुटबॉल संचालक रवी पुस्कूर यांनी सांगितले.

‘‘कर्णधार या नात्याने त्याने संघाला अत्त्युच्च शिखर गाठून दिले, त्यामुळे आम्ही प्रतिष्ठेच्या एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारे पहिले ठरलो. मैदान आणि मैदानाबाहेरही एदूचे उल्लेखनीय नेतृत्वगुण त्याच्या खेळातील प्रत्येक पैलूत दिसून आले,’’ असे रवी पुढे म्हणाले.

अनुभवी मध्यरक्षकाची अद्वितीय कामगिरी

  • २१ जानेवारी २०१८ रोजी केरळा ब्लास्टर्सविरुद्धच्या अवे विजयात एदू बेदियाचा आयएसएल स्पर्धेतील पहिला गोल

  • २०१८-१९ मोसमात सर्वोत्तम कामगिरी, आयएसएल व सुपर कप मिळून एकूण २३ सामन्यांत ८ गोल, ५ असिस्ट

  • २०१८-१९ मोसमात आयएसएल उपविजेतेपद, सुपर कप विजेतेपद मिळविलेल्या संघाचा कर्णधार

  • २०२१ मध्ये एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेत भारतीय क्लबतर्फे पहिला गोल नोंदविण्याचा मान, इराणच्या पर्सेपोलिस एफसीविरुद्ध ब्रँडन फर्नांडिसच्या फ्रीकिकवर गोल

  • २०२१ मध्ये ड्युरँड कप विजेतेपदात मोहम्मेडन स्पोर्टिंगविरुद्धच्या अंतिम लढतीत निर्णायक इंज्युरी टाईम गोल

  • सर्व स्पर्धांत मिळून एफसी गोवातर्फे १२२ सामने, १६ गोल व १६ असिस्ट

  • आयएसएल स्पर्धेत १०५ सामने, १३ गोल व १६ असिस्ट

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोवा राजभाषा कायद्यात मराठी नको म्हणाणाऱ्या दामोदर मावजो यांची अभिजात दर्जानंतर पहिली प्रतिक्रिया; स्पृश्य - अस्पृश्यतेचा केला उल्लेख

Sand Mining: गोव्यात बांधकामांना आता 'अच्छे दिन' 'मांडवी', 'झुआरी'त रेती उपशास मुभा; दरावरही येणार नियंत्रण

कोने, प्रियोळ येथे भीषण अपघातात एक ठार; दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी 4 अपघात, गोव्यातील ठळक बातम्या

Goa News: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्प्रिंगबोर्ड टॅबलेटचे वाटप

सुभाष वेलिंगकरांना अटक होणार का? गोव्यात कॅथलिक समाज आक्रमक, पोलिस स्थानकांवर निदर्शने

SCROLL FOR NEXT