Ashes 2023 Eng vs Aus: स्विंगच्या किंगची बादशाहत! जेम्स अँडरसनने गाठला मोठा टप्पा

Ashes 2023: इंग्लंडचा स्टार अनुभवी गोलंदाज जेम्स अँडरसन त्याच्या कारकिर्दीत एकापाठोपाठ एक मोठी कामगिरी करत आहे.
James Anderson
James Anderson Dainik Gomantak
Published on
Updated on

Ashes 2023 Eng vs Aus: इंग्लंडचा स्टार अनुभवी गोलंदाज जेम्स अँडरसन त्याच्या कारकिर्दीत एकापाठोपाठ एक मोठी कामगिरी करत आहे. एजबॅस्टन येथे ऍशेस 2023 च्या पहिल्या कसोटीदरम्यान त्याने कारकिर्दीतील आणखी एक टप्पा पार केला.

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जात असलेल्या सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात अँडरसनने 1100 वी प्रथम श्रेणी विकेट घेतली. अॅलेक्स कॅरीला बाद करुन त्याने हे स्थान गाठले.

दरम्यान, अँडरसनला ऍशेस 2023 मध्ये पहिली विकेट मिळवण्यासाठी दोन दिवस मेहनत करावी लागली.

ऑस्ट्रेलियाच्या (Australia) पहिल्या डावातील 99 व्या षटकात चौथ्या चेंडूवर अँडरसनने कॅरीला बाद केले. अशा प्रकारे स्विंगच्या राजाने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 1100 वी विकेट घेतली.

James Anderson
Ashes 2023: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये कुणाचं पारड जड? हेड टू हेड रेकॉर्ड जाणून घ्या

विल्फ्रेड रोड्सच्या नावावर विक्रम नोंदवला गेला आहे

प्रथम श्रेणीमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम इंग्लंडचा माजी दिग्गज विल्फ्रेड रोड्सच्या नावावर आहे. त्याने 1110 सामन्यात 4204 बळी घेण्याचा विक्रम केला. जो आजपर्यंत कोणताही गोलंदाज तोडू शकला नाही.

अँडरसनच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने 180 सामन्यांत 686 विकेट घेतल्या आहेत. सर्वाधिक कसोटी बळी घेण्याच्या बाबतीत तो जगातील तिसरा गोलंदाज आहे.

James Anderson
Ashes, 1st Test: कोहली, रहाणेची विकेट घेणारा स्टार्क ऑस्ट्रेलियाच्या Playing-11 मधून बाहेर! 'या' दिग्गजांचं कमबॅक

दुसरीकडे, आता तो दिवंगत ऑस्ट्रेलियन गोलंदाज शेन वॉर्नच्या (Shane Warne) विक्रमाजवळ पोहोचला आहे. वॉर्नने आपल्या कारकिर्दीत 708 विकेट घेतल्या आहेत. एखाद्या खेळाडूच्या प्रथम श्रेणीच्या आकडेवारीत त्याच्या कसोटी सामन्यातील कामगिरीचाही समावेश होतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com