Eng vs Aus, Ashes 2023: शतक झळकावताच उस्मान ख्वाजा बनला नंबर-1 फलंदाज, विराटला सोडले मागे

Usman Khawaja Century: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ऍशेस मालिकेतील पहिला कसोटी सामना खेळला जात आहे.
Usman Khawaja
Usman Khawaja Dainik Gomantak

Usman Khawaja Century: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ऍशेस मालिकेतील पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंड संघाने 8 गडी गमावून 393 धावांवर डाव घोषित केला.

त्याचवेळी ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 386 धावा केल्या होत्या. या कारणामुळे इंग्लंडला 7 धावांची आघाडी मिळाली. या सामन्यात उस्मान ख्वाजाने ऑस्ट्रेलियाकडून शानदार शतक झळकावले.

त्याच्यामुळेच ऑस्ट्रेलियन संघ मोठी धावसंख्या गाठू शकला. उस्मानने शतक झळकावताच एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. त्याबद्दल जाणून घेऊया...

उस्मान ख्वाजाने चमत्कार केला

उस्मान ख्वाजा शानदार फॉर्ममध्ये आहे. त्याने 2023 मध्ये ऑस्ट्रेलियन संघासाठी अनेक शानदार खेळी खेळल्या आहेत. इंग्लंडविरुद्धच्या ऍशेसच्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याने 321 चेंडूत 141 धावा केल्या, ज्यात 14 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता.

2023 मध्ये त्याने मोठी खेळी खेळतानाच कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्याने आतापर्यंत 7 सामन्यात 3 शतकांसह 682 धावा केल्या आहेत. ख्वाजाने केन विल्यमसनला मागे टाकले आहे. विल्यमसनने 5 सामन्यात 556 धावा केल्या आहेत.

विराट कोहलीने (Virat Kohli) 2023 मध्ये आतापर्यंत कसोटी सामन्यांमध्ये 360 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर, रोहित शर्माने 300 धावा केल्या आहेत.

Usman Khawaja
Ashes 2023: स्विंगच्या किंगची बादशाहत! जेम्स अँडरसनने गाठला मोठा टप्पा

2023 मध्ये कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू:

उस्मान ख्वाजा - 682 धावा

केन विल्यमसन - 556 धावा

कुशल मेंडिन्स - 536 धावा

ट्रॅव्हिस हेड - 536 धावा

दिमुथ करुणारत्ने - 501 धावा

Usman Khawaja
Ashes 2023: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये कुणाचं पारड जड? हेड टू हेड रेकॉर्ड जाणून घ्या

रेकॉर्ड्स

उस्मान ख्वाजाने इंग्लिश भूमीवर पहिले शतक झळकावले आहे. यासोबतच त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील एकूण 15 वे शतक झळकावले आहे. ख्वाजाने ऑस्ट्रेलियन संघासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत. फलंदाजीच्या कोणत्याही आक्रमणाला मुरड घालण्याची क्षमता त्याच्यात आहे. त्याने ऑस्ट्रेलियासाठी (Australia) 61 कसोटी सामन्यांमध्ये 4508 धावा केल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com