ISL 2022 Winner Hyderabad FC with Governor of Goa
ISL 2022 Winner Hyderabad FC with Governor of Goa  Dainik Gomantak
क्रीडा

ISL 2022 : आयएसएल विजेत्या हैदराबाद एफसीचा राज्यपालांकडून गौरव

दैनिक गोमन्तक

पणजी : इंडियन सुपर लीगचे विजेते हैदराबाद एफसीचा गोव्याचे राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई यांनी सत्कार केला. दोना पावला येथील राजभवनावर आयएसएल विजेत्या हैदराबाद संघासोबत राज्यपालांनी काही वेळ घालवला. विजेत्या संघासोबत कप्तान जो व्हिक्टर, संघाचे मुख्य प्रशिक्षक मानोलो मर्केझ, संघाचे मालक वरुण त्रिपुरानेनी, त्यांची पत्नी चंदना आणि संचालक सुजय शर्मा उपस्थित होते.

हैदराबाद एफसीला (Hyderabad FC) प्रथमच इंडियन सुपर लीग (आयएसएल) करंडक जिंकण्याचा मान यंदा मिळाला आहे. अनुभवी गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमनी याने पेनल्टी शूटआऊटवर तीन फटके अडवत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. 1-1 गोलबरोबरीनंतर पेनल्टी शूटआऊटवर 3-1 फरकाने हार पत्करल्यामुळे केरळा ब्लास्टर्सला तिसऱ्यांदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. रंगतदार ठरलेला अंतिम सामना रविवारी फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाला आहे.

आयएसएल (ISL) स्पर्धेच्या इतिहासात तिसऱ्यांदा विजेतेपदाचा सामना अतिरिक्त वेळेत गेला. यापूर्वी 2016 मध्ये कोची येथे एटीके संघाने पेनल्टी शूटआऊटवर केरळा ब्लास्टर्सला हरविले होते, तर 2018-19 मध्ये मुंबई (Mumbai) येथे अतिरिक्त वेळेतील गोलमुळे बंगळूर एफसीने एफसी गोवावर मात केली होती.

केरळमधून मोठ्या संख्येने केरळा ब्लास्टर्सचे चाहते रविवारी फातोर्ड्यात दाखल झाले होते. हा संघ यलो जर्सीसाठी ओळखला जातो. त्यामुळे नेहरू स्टेडियमवर संघाच्या चाहत्यामुळे पिवळी लाट उसळलेली पाहायला मिळाली. प्रत्यक्षात सामन्यात केरळा ब्लास्टर्सचे खेळाडू अवे सामना असल्याने काळ्या, तर हैदराबादचे खेळाडू यलो जर्सीत खेळले. अधिकृत आकडेवारीनुसार पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर 11,500 उपस्थिती होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa Today's Live Update: पर्वरी येथे मराठी राजभाषा साहित्य संमेलनास सुरुवात

Mapusa News : झोपडपट्ट्या कायदेशीर करणार : रमाकांत खलप

Panaji News : भाजपने पक्षांतराबद्दल भूमिका स्पष्ट करावी; इंडिया आघाडीच्या प्रवक्त्यांची मागणी

Mark Zuckerberg यांचा पगार फक्त 83 रुपये, पण सुरक्षेवर होतो कोट्यवधींचा खर्च; उत्पन्न आणि खर्चाचा हिशेब पाहून व्हाल थक्क!

Valpoi News : प्रलंबित खटल्यांमध्ये ‘मध्यस्थी’ उत्तम पर्याय : ॲड. सावईकर

SCROLL FOR NEXT