FC Goa's victory in the football tournament
FC Goa's victory in the football tournamentDainik Gomantak

Goa Professional League : फुटबॉल स्पर्धेत एफसी गोवा विजयी

गोवा प्रोफेशनल लीग; शेवटच्या मिनिटात गोल नोंदवून साळगावकरला रोखले
Published on

पणजी ः गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल (Football) सामन्यातील शेवटच्या मिनिटास गोल नोंदवत एफसी गोवाने रविवारी पराभव टाळला. मेव्हन डायसच्या गोलमुळे माजी विजेत्या साळगावकर एफसीचे पूर्ण तीन गुणांचे स्वप्न भंगले. सामना घोगळ-मडगाव (Margao) येथील चौगुले महाविद्यालय मैदानावर झाला.

साळगावकर एफसी संघ विश्रांतीला एका गोलने आघाडीवर होता. मार्क कार्व्हालो याने 40 व्या मिनिटास केलेल्या गोलमुळे अखेरच्या मिनिटापर्यंत साळगावकर संघ विजयाच्या दिशेने होता, मात्र बरोबरीच्या गोलनंतर त्यांना एका गुणावर समाधान मानावे लागले. एफसी गोवा संघाने सलग दुसरी बरोबरी नोंदवली.

FC Goa's victory in the football tournament
अन्यथा 'या' प्रकरणाला वेगळे वळण लागणार काँग्रेस आमदारांचा इशारा

पूर्वार्धातील खेळात जोव्हियल डायस याचा नेम दोन वेळा चुकला, त्यामुळे एफसी गोवास आघाडी घेता आली नाही. नंतर 70 व्या मिनिटास एचपी लालरेमरुआता या फटका क्रॉसबारला आपटल्यामुळे एफसी गोवास (FC Goa) पिछाडी भरून काढता आली नाही. 84 व्या मिनिटास हेडर किंचित हुकल्यानंतर 90 व्या मिनिटास मेव्हनने दूरवरून मारलेल्या फटक्यावर संधी साधली आणि एफसी गोवाच्या खाती बरोबरीची नोंद झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com