Ishant Sharma | Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

Ishant Sharma on Virat Kohli: 'विराटप्रमाणे माझ्याबरोबर तसं घडलं असतं, तर मैदानावरच गेलो नसतो...', इशांतने सांगितली आठवण

इशांत शर्माने विराट कोहलीबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

Pranali Kodre

Ishant Sharma open up on how Virat Kohli dealt with father’s death: भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहली चांगले मित्र आहेत. ते त्यांच्या ज्यूनियर क्रिकेटमधील दिवसांपासून एकत्र खेळले आहेत, त्यामुळे त्या दोघांनी एकमेकांची प्रवास पाहिली आहे.

इशांत आणि विराट दिल्लीकडून 17 वर्षांखालील क्रिकेटमधील दिवसांपासून एकत्र खेळत आहेत. ते नंतर भारतीय संघातही संघसहकारी झाले. त्यामुळे त्यांच्यात घट्ट मैत्रीही झाली. दरम्यान, इशांतने नुकतेच विराटच्या आयुष्यात सर्वात कठीण काळाबद्दल भाष्य केले आहे.

ज्यावेळी 17 वर्षांचा विराट दिल्लीकडून खेळत असताना त्याला वडिलांच्या निधनाबद्दल कळाले होते, त्या टप्प्याबद्दल इशांतने सांगितले आहे.

इशांतने बिअरबायसेप्स या युट्यूब चॅनेलवर दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की 'ज्यादिवशी विराट कोहलीच्या वडिलांचे निधन झाले, त्यादिवशी तो एकटा बसला होता आणि निराश होता. त्याला कळत नव्हते की कसे व्यक्त व्हावे, पण नंतर त्याने फलंदाजी केली आणि सामना जिंकला. त्यावेळी तो फक्त 17 वर्षांचा होता.'

'आजही मला माहित नाही की त्याने ते कसे केले. जर माझ्याबरोबर असे काही झाले असते, तर मी मैदानावरही गेलो नसतो.'

विराट कोहलीचे वडील प्रेम कोहली यांचे 2006 मध्ये निधन झाले होते. त्यावेळी विराट दिल्लीकडून रणजी ट्रॉफी खेळत होता.

याशिवाय इशांतने सांगितले की त्याने विराटचे कारकिर्दीतील सर्व टप्पे पाहिले आहेत. तसेच त्याने असेही सांगितले की विराटच्या आयुष्यात अनुष्का आल्यापासून तो आता बराच शांत झाला आहे.

त्याने सांगितले की 'मी त्याच्या आयुष्यातील जवळपास सर्व टप्पे पाहिले आहेत. पार्टी ते टॅट्यू, फिटनेस फ्रिक ते टॉप परफॉर्मन्स, त्याने त्याच्या कारकिर्दीत मोठा बदल केला आहे. त्याला पार्टी करायला आवडायचे.'

'कोलकातामधील एका स्पर्धेदरम्यान, तो पूर्ण रात्र पार्टी करत होता. पण तरी त्याने दुसऱ्या दिवशी 250 धावा केल्या होत्या. तो दुसऱ्या दिवशी नाबाद राहिला. आम्ही 19 वर्षांखाली संघाकडूनही एकत्र खेळलो.'

दरम्यान, इशांतने भारताकडून विराटच्या पूर्वी 2007 मध्येच पदार्पण केले होते. त्याच्यानंतर जवळपास एकवर्षाने विराटने भारताकडून पदार्पण केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सायंकाळी गोव्याचा एक मूड असतो! त्यांना जास्त वेळ थांबवणं योग्य नाही; भाषण उरकत घेत अमित शहांची मिश्किल टिप्पणी

Amit Shah In Goa: "2047 पर्यंत वाट पाहायची गरज नाही, 2037 पर्यंत गोवा 'विकसित राज्य' बनेल", गृहमंत्री अमित शहांचा विश्वास

Rohit Sharma Captaincy: 'राजकीय' खेळात 'हिटमॅन' रोहितची विकेट! टीम इंडियावर गंभीर आरोप, चाहत्यांनी व्यक्त केली नाराजी

अमित शहांच्या हस्ते 'म्हजे घर योजने'चा भव्य शुभारंभ! CM सावंतांनी दिली '6 महिन्यांत नोंदणी'ची ग्वाही

ओपा प्रकल्पातील दुरुस्ती पूर्णत्वाकडे; पणजीला 11 वाजेपर्यंत पाणीपुरवठा सुरु होण्याची शक्यता!

SCROLL FOR NEXT