IPL 2023: कॉपी करण्यासाठीही बुद्धी लागते असे म्हणतात. क्रिकेटमध्येही नकल होते. नकल बॉल, ज्याचा वापर अनेक गोलंदाज शस्त्र म्हणून करतात. पण, कोण किती अचूकतेने प्रयत्न करतो, यावरच सामन्यात सर्व काही अवलंबून असते. बरे, कोणी करो किंवा न करो, पण इशांत शर्मा नकलबॉलमध्ये मास्टर आहे, यात काही शंका नाही.
दरम्यान, गुजरात टायटन्सविरुद्धच्या (Gujarat Titans) सामन्यात इशांतने एकूण 24 चेंडू टाकले. पण, यापैकी त्याचा एक चेंडू असा होता, ज्याने खळबळ उडवून दिली. फलंदाजाना हादरवणारा, तो चेंडू खरच अवाक करणारा होता. खरं तर इशांतने टाकलेला तो नकल बॉल होता.
इशांतच्या नकल बॉलचा वेग ताशी 119 KPH होता. गुजरातच्या डावातील 5 वे षटक संपणार होते. तो नकल बॉल हा या षटकाचा शेवटचा चेंडू होता. मात्र, या चेंडूसमोर विजय शंकर इतका हतबल दिसला की, चेंडू कुठे लागला हेही त्याला कळले नाही.
इशांतच्या या नकल बॉलचे आश्चर्य आणि अचूकता ज्या कोणी पाहिली त्याला याची खात्री पटली. इशांतला दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेनकडून याबद्दल सर्वात मोठी प्रशंसा मिळाली, ज्याने ट्विट करत म्हटले की, मी विकेटसाठी नकल बॉलचा यापेक्षा चांगला वापर कधीही पाहिला नव्हता.
इशांत शर्माने (Ishant Sharma) नकल बॉलवर विजय शंकरची विकेट घेत सामन्यात आणखी एक विकेट घेतली. सामन्यातील शेवटचे षटक टाकताना त्याने राहुल तेवतियाच्या रुपात ही विकेट घेतली. इशांत शर्माने 4 षटकात 23 धावा देत 2 बळी घेतले. या दोन्ही विकेट त्याने ताशी119 KPH वेगाने घेतल्या.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.