Ishan Kishan troll CSK fans Dainik Gomantak
क्रीडा

Ishan Kishan troll CSK fans: चेपॉकवर 'Whistle Podu' स्टाईलने ईशानने चेन्नईला डिवचले, चाहत्यांना दिला 'घरी जाण्याचा' इशारा Video Viral

Ishan Kishan troll CSK fans video: आयपीएल २०२६ च्या रोमांचक लढतीत सनरायझर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) त्यांच्याच घरच्या मैदानावर म्हणजेच चेपॉकवर ५ गडी राखून पराभव केला.

Sameer Amunekar

चेन्नई: आयपीएल २०२६ च्या रोमांचक लढतीत सनरायझर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) त्यांच्याच घरच्या मैदानावर म्हणजेच चेपॉकवर ५ गडी राखून पराभव केला आणि प्लेऑफमधील आपले स्थान निश्चित केले. हैदराबादच्या या विजयात यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशनने धडाकेबाज कामगिरी केली. मात्र, सामना संपल्यानंतर ईशान किशनने मैदानात केलेल्या एका इशाऱ्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. चेन्नईच्या चाहत्यांना (CSK Fans) ट्रोल केल्याचा आरोप ईशानवर केला जात असून, या संदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

ईशान किशनची मॅचविनिंग खेळी

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्सने २० षटकांत ७ बाद १८० धावांचा आव्हानात्मक धावसंख्या उभारली होती. या लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादकडून ईशान किशनने वादळी फलंदाजी केली. त्याने अवघ्या ४७ चेंडूंत ७ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ७० धावांची उत्कृष्ट खेळी साकारली. त्याच्या या खेळीच्या जोरावर हैदराबादने एक षटक राखून १८१ धावा करत सामना खिशात टाकला.

सामना जिंकल्यानंतर ईशान किशनने चेपॉक स्टेडियमवर उपस्थित असलेल्या चेन्नईच्या प्रेक्षकांच्या दिशेने पाहत आधी तोंडाने शिट्टी वाजवली (ज्याला सीएसकेचे चाहते 'व्हिसल पोडू' म्हणतात). त्यानंतर त्याने दोन्ही हातांनी घराचा आकार तयार केला आणि चाहत्यांना हाताने 'आता इथून घरी निघून जा' असा इशारा केला.

विजयाच्या जल्लोषाचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरकऱ्यांमध्ये दोन गट पडले आहेत. चेन्नईच्या चाहत्यांनी ईशानच्या या वागणुकीवर तीव्र संताप व्यक्त केला आहे, तर काहींनी हा निव्वळ मैदानी स्लेजिंगचा भाग असल्याचे सांगत त्याचे समर्थन केले आहे.

५ वेळच्या चॅम्पियन चेन्नईचा प्लेऑफचा मार्ग बिकट

या पराभवामुळे पाच वेळच्या विजेत्या चेन्नई सुपर किंग्सच्या प्लेऑफ गाठण्याच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. चेन्नईच्या खात्यात सध्या १३ सामन्यांत केवळ १२ गुण असून ते गुणतालिकेत सहाव्या स्थानावर घसरले आहेत. चेन्नईला लीग स्टेजमध्ये आता फक्त एकच सामना खेळायचा आहे. हा सामना जिंकला तरी चेन्नई जास्तीत जास्त १४ गुणांपर्यंत पोहोचू शकते. दिल्ली कॅपिटल्सची स्थितीही हुबेहूब अशीच असून तेही १४ गुणांच्या पुढे जाऊ शकत नाहीत.

असे आहे प्लेऑफचे गणित

चेन्नई आणि दिल्लीच्या तुलनेत राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या शक्यता जास्त आहेत. राजस्थानचे अजून दोन सामने शिल्लक असून त्यांच्या खात्यात १२ गुण आहेत. त्यांनी दोन्ही सामने जिंकल्यास ते थेट १६ गुणांसह पात्र ठरतील, मात्र एक सामना हरल्यास ते १४ गुणांवर अडकतील.

दुसरीकडे, पंजाब किंग्जचे १३ सामन्यांत १३ गुण आहेत. पंजाबला प्लेऑफ गाठण्यासाठी राजस्थानने त्यांचा किमान एक सामना हरावा अशी प्रार्थना करावी लागेल, तसेच स्वतःचा शेवटचा सामना कोणत्याही परिस्थितीत मोठ्या फरकाने जिंकावा लागेल. त्यामुळे या वेळचे प्लेऑफचे समीकरण कमालीचे गुंतागुंतीचे झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT