Shubman Gill & Ishan Kishan Dainik Gomantak
क्रीडा

WI vs IND, 2nd ODI: इशान किशनची शानदार हॅट्ट्रिक, शुभमनने पुन्हा केली निराशा

Manish Jadhav

WI vs IND, 2nd ODI: भारतीय संघाने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकाची तयारी सुरु केली आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेपासून टीम इंडियाने वेगवेगळे प्रयोग करुन तयारीला सुरुवात केली आहे.

टीम इंडियाच्या फलंदाजीचा कणा मानल्या जाणाऱ्या कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विश्रांती देण्यात आली. मात्र, रोहितने पहिल्या वनडेत इशान आणि गिलसोबत डावाची सुरुवात केली.

दुसऱ्या वनडेतही असेच काहीसे घडले. रोहितच्या अनुपस्थितीतही ही जोडी सलामीसाठी आली. पहिल्या विकेटसाठी दोघांनी 90 धावांची भर घातली, पण आकडेवारी पाहता एकाने निराश तर दुसऱ्याने टीम इंडियासाठी नव्या आशा पल्लवीत केल्या आहेत.

शुभमन गिलने टीम इंडियाचे टेन्शन वाढवले

दरम्यान, शुभमन गिलबद्दल (Shubman Gill) बोलायचे झाल्यास त्याचा फ्लॉप शो टीम इंडियासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. विश्वचषकाची तयारी सुरु असताना टीम इंडियाला त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

वर्षाची शानदार सुरुवात करणाऱ्या गिलने गेल्या काही सामन्यांमध्ये संघाची चिंता वाढवली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत अपयशी ठरल्यानंतर तो वनडेतही फ्लॉप ठरत आहे.

पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने 7 धावा केल्या, तर दुसऱ्या वनडेत त्याला 49 चेंडूत केवळ 34 धावा करता आल्या. आयपीएलपूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेतही गिल फ्लॉप ठरला होता.

गिलच्या शेवटच्या 5 वनडे चिंताजनक

शुभमन गिलच्या गेल्या 5 एकदिवसीय सामन्यातील कामगिरीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने केवळ 98 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये तीन सामने ऑस्ट्रेलिया मालिकेतील आहेत तर दोन सामने वेस्ट इंडिजविरुद्धचे आहेत.

गिलने या कालावधीत अनुक्रमे 20, 0, 37, 7 आणि 34 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर, कसोटी सामन्यातही त्याचा फॉर्म घसरला आहे. ओव्हल येथे खेळल्या गेलेल्या WTC फायनलमध्ये, त्याने फक्त 13.18 धावा करुन सलामी दिली आणि निराश केले.

यानंतर त्याने वेस्ट इंडिजच्या (West Indies) कसोटी मालिकेतील तीन डावात केवळ 6, 10 आणि नाबाद 29 धावा केल्या. हे पाहता त्याची हरवलेली लय परत मिळवण्यासाठी त्याची धडपड सुरु असल्याचे स्पष्ट होते.

त्याच्या खराब फॉर्ममुळे विश्वचषक संघात इशान किशनचा मार्ग मोकळा झाला आहे, ज्याने तीन बॅक टू बॅक अर्धशतके झळकावली आहेत.

इशान किशनने पन्नास धावांची हॅट्ट्रिक केली

जिथे शुभमन गिल अपयशी ठरत आहे, तिथे विश्वचषकासाठी बॅकअप सलामीवीर म्हणून गणला जाणारा इशान किशन सातत्याने आपला दावा सिद्ध करत आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत लाल चेंडूने पदार्पण करणाऱ्या इशानने दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात 34 चेंडूत 52 धावा करत आपले पहिले कसोटी अर्धशतक झळकावले.

त्यानंतर त्याने पहिल्या दोन वनडेतही सलामी करताना अर्धशतकी खेळी खेळली आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात किशनने 46 चेंडूत 52 धावा केल्या आणि टीम इंडियाने हा सामना 5 विकेटने जिंकला.

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इशानने 55 चेंडूत 55 धावांची खेळी केली. अशा प्रकारे त्याने पन्नास धावांची हॅट्ट्रिक केली. अशा परिस्थितीत गिलची कामगिरी अशीच सुरु राहिली तर रोहित शर्मासोबत तो वर्ल्ड कपमध्ये सलामीवीर म्हणून दिसणार नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT