Team India Dainik Gomantak
क्रीडा

IND vs NZ: भारताची डोकेदुखी वाढली! हार्दिकपाठोपाठ 'हे' दोन खेळाडूही न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातून बाहेर?

World Cup 2023: न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यापूर्वी हार्दिक पाठोपाठ भारताचे दोन फलंदाज दुखापतग्रस्त झाले आहेत.

Pranali Kodre

ICC Cricket World Cup 2023, India vs New Zealand:

वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात रविवारी सामना खेळवला जाणार आहे. हा सामना धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. दरम्यान, या सामन्यापूर्वीच भारताला मोठा धक्का बसला आहे.

या सामन्यात इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. खरंतर यापूर्वीच हार्दिक पंड्या बागंलादेशविरुद्ध १९ ऑक्टोबरला झालेल्या सामन्यादरम्यान दुखापतग्रस्त झाला होता. त्याच्या डाव्या पायाच्या घोट्याला दुखापत झाल्याने तो यापूर्वीच या सामन्यातून बाहेर झाला आहे.

त्यामुळे त्याच्या जागेवर इशान किशन किंवा सूर्यकुमार यादव यांच्यापैकी एकाची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र आता अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार असे समोर आले आहे की सूर्यकुमारचे सराव सत्रावेळी मनगट दुखावले गेले आहे. तसेच इशान किशनच्या डोक्याच्या मागे मधमाशीनं दंश केला आहे.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार भारतीय संघाचा थ्रो-डाऊन स्पेशालिस्ट रघू यांनी फुलटॉस टाकला, त्यावेळी सूर्यकुमारला मनगटामध्ये वेदना झाल्या, त्यावर तो आईसपॅक लावतानाही दिसला होता. तसेच त्याने त्यानंतर नेटमध्ये सराव करणेही सोडले.

तसेच इशानला फलंदाजीचा सराव करत असताना हेल्मेटच्या खाली मधमाशीने दंश केला. त्यामुळे त्यालाही नेट सेशन सोडावे लागले. त्यामुळे आता त्यांच्या तंदुरुस्ती पाहून त्यांना खेळवण्याबद्दल निर्णय घेतला जाऊ शकतो.

दरम्यान, भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना रोमांचक ठरणार आहे, कारण या स्पर्धेत केवळ हे दोन संघ अपराजीत आहेत. त्यांनी आत्तापर्यंत एकही सामना पराभूत झालेला नाही.

असे आहेत दोन्ही संघ -

  • भारत - रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, आर अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.

  • न्यूझीलंड - केन विलियम्सन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साऊथी, विल यंग.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT