IND vs NZ, Video: वीस वर्षांनी न्यूझीलंडविरुद्ध विजय पक्का का? गिलच्या प्रश्नावर कर्णधार रोहितने दिलं उत्तर

Shubman Gill - Rohit Sharma: बांगलादेशविरुद्ध विजय मिळवल्यानंतर आता तब्बल २० वर्षांनी भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध विजयाचा दुष्काळ संपवणार का? असा प्रश्न गिलने रोहित शर्माला विचारला होता.
Shubman Gill - Rohit Sharma
Shubman Gill - Rohit SharmaBCCI
Published on
Updated on

ICC ODI Cricket World Cup 2023, India vs New Zealand, Rohit Sharma, Shubman Gill:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धत रविवारी (22 ऑक्टोबर) भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात सामना रंगणार आहे. धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्याला दुपारी 2 वाजता सुरुवात होईल.

या सामन्याकडे सर्वांचे लक्ष असेल, कारण केवळ भारत आणि न्यूझीलंड हे दोनच संघ आहेत, जे वनडे वर्ल्डकपमध्ये अद्याप अपराजित आहेत. दरम्यान, या सामन्याबद्दल रोहित शर्माने आपले मत व्यक्त केले आहे.

गुरुवारी (19 ऑक्टोबर) भारताने बांगलादेशविरुद्ध 7 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात रोहितनेही 48 धावांची खेळी करत महत्त्वाचा वाटा उचलला. या सामन्यानंतर त्याला सलामी साथीदार शुभमन गिलने रोहितशी संवाद साधला होता. त्याचा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Shubman Gill - Rohit Sharma
World Cup 2023: मैदान जिंकणारा विराट मन जिंकतो; कारण एकच!

या व्हिडिओमध्ये गिल रोहितला विचारतो की भारतीय संघ चारही सामने जिंकला आहे, पण आता पुढील सामना न्यूझीलंडशी खेळायचा आहे. तसेच 2003 नंतर भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध आयसीसीच्या वनडे किंवा टी20 स्पर्धांमध्ये विजय मिळवू शकलेला नाही, तर रविवारी होणाऱ्या सामन्याबद्दल काय वाटते?

त्यावर रोहित म्हणाला, 'आपण चांगले क्रिकेट खेळत आहोत, आपण सर्वोत्तम प्रयत्न करू.' त्यानंतर गिलने पुढे विचारले की पुढच्या सामन्यातीलही विजय पक्का समजायचा का?

यावर रोहितने थोडं सावध भूमिका घेत उत्तर दिले की 'आपण असे क्रिकेट खेळत नाही की आपण असं काही पक्कं समजू. आपण जेव्हा मैदानात जाऊ, तेव्हा आपण संघ म्हणून जे करत आलोत, तेच करायला पाहिजे.'

Shubman Gill - Rohit Sharma
Team India Video: जड्डूने मेडल अन् मनंही जिंकली! थेट स्टेडियमच्या स्क्रिनवर फोटो झळकताच टीम इंडियाचा कल्ला

दरम्यान, गिलने रोहितला बांगलादेशविरुद्धच्या त्याच्या विकेटबद्दलही विचारले. त्यावर रोहित म्हणाला, 'मी चिडलो नाही, पण मी तेव्हा चूकीचा फटका खेळलो. मला वरती मारायचा होता आणि मी शॉट खाली खेळला.'

यानंतर गिल भारतीय संघातील इशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या अशा इतर खेळाडूंशी मस्ती करताना व्हिडिओमध्ये दिसला.

भारताच्या न्यूझीलंडविरुद्धच्या कामगिरीबद्दल सांगायचे झाल्यास भारत आणि न्यूझीलंड वनडे वर्ल्डकमध्ये 9 वेळा आमने-सामने आले आहेत, त्यातील 5 वेळा न्यूझीलंडने विजय मिळवला आहे, तर 3 वेळा भारताने विजय मिळवला आहे. एक सामना अनिर्णित राहिला आहे.

तसेच भारताने न्यूझीलंडविरुद्ध वनडे किंवा टी20 आयसीसी स्पर्धांमध्ये अखेरचा विजय 2003 साली मिळवला होता. सन 2003 नंतर या दोन संघांमध्ये वनडे आणि टी20 आयसीसी स्पर्धांमध्ये 5 सामने झाले. त्यातील 4 सामने न्यूझीलंडने जिंकले, तर एक सामन्याचा निकाल लागला नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com