Shubman Gill | Ishan Kishan ICC
क्रीडा

Shubman Gill: गिलची तब्येत कशीये? इशान किशन म्हणाला, 'तो आता...'

India vs Afghanistan: भारताने बुधवारी अफगाणिस्तानविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर शुभमन गिलच्या आरोग्याबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे.

Pranali Kodre

Ishan Kishan Gave Health Update on Shubman Gill:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत बुधवारी भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात सामना झाला. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने 8 विकेट्सने सहज विजय मिळवला. दरम्यान, या सामन्यानंतर भारताचा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनने शुभमन गिलबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

भारताचा प्रतिभाशाली युवा सलामीवीर शुभमन गिलला वर्ल्डकप 2023 स्पर्धेला सुरुवात होण्याच्या काही दिवस आधीच डेंग्यू झाल्याचे निदान झाले. त्यामुळे डेंग्युमुळे त्याची तब्येत बिघडली होती.

त्यामुळे तो भारताकडून ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान या संघाविरुद्धचे सामनेही खेळू शकला नाही. त्याच्याऐवजी इशान किशनला सलामीला खेळण्याची संधी देण्यात आली होती.

महत्त्वाचे म्हणजे चेन्नईला भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना खेळल्यानंतर गिल संघासह दिल्लीलाही आला नव्हता. त्याच्यावर काहीदिवस चेन्नईमध्येच उपचार करण्यात आले.

त्यानंतर आता तो 11 ऑक्टोबर रोजी अहमदाबादला पोहचला असल्याचे समजत आहे. तिथे तो भारतीय संघात सामील होईल. भारताला अहमदाबादमध्ये पाकिस्तानविरुद्ध शनिवारी (14 ऑक्टोबर) सामना खेळायचा आहे. मात्र, या सामन्यातही गिलच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह असेल.

दरम्यान, असे असले तरी त्याच्या आरोग्याबाबत इशानने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर स्टार स्पोर्ट्सच्या कार्यक्रमात रवी शास्त्री, गौतम गंभीर आणि इरफान पठाण यांच्याशी बोलताना सांगितले की 'तो बरा होत आहे आणि बाकी लोकांपेक्षा अधिक वेळाने बरा होतोय. लवकरच तो भारतासाठीही खेळताना दिसेल. तो त्याच्या फिटनेसवरही काम करत आहे.'

तथापि, गिल बरा होत असला, तरी आता तो भारताकडून पुनरागमन कधी करणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. तसेच जर गिलचे भारतीय संघात पुनरागमन झाले, तर फलंदाजी फळीतील कोणाच्या जागेवर त्याला संधी द्यायची, याबाबत कठोर निर्णय भारतीय संघव्यवस्थापनाला घ्यावा लागणार आहे.

गिल दमदार फॉर्ममध्ये

गिलने 2023 यावर्षी आत्तापर्यंत 20 वनडे सामन्यांमध्ये खेळताना 72.35 च्या सरासरीने 1230 धावा केल्या आहेत. सध्या यावर्षी वनडेत 1000 धावांचा टप्पा पार करणारा तो एकमेव फलंदाज आहे. त्याने यावर्षी 5 शतके आणि 5 अर्धशतके केली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT