Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

Abroad Career Trends: भारताला 'तरुणांचा देश' म्हटले जाते, पण आता हीच युवाशक्ती परदेशातील संधींकडे मोठ्या आशेने पाहत असल्याचे एका धक्कादायक अहवालातून समोर आले आहे.
Abroad Career Trends
Abroad Career TrendsDainik Gomantak
Published on
Updated on

Abroad Career Trends: भारताला 'तरुणांचा देश' म्हटले जाते, पण आता हीच युवाशक्ती परदेशातील संधींकडे मोठ्या आशेने पाहत असल्याचे एका रिपोर्टमधून समोर आले आहे. 'टर्न ग्रुप' या ग्लोबल टॅलेंट प्लॅटफॉर्मने नुकताच एक सर्व्हे प्रसिद्ध केला. रिपोर्टनुसार, देशातील निम्म्याहून अधिक म्हणजेच 52 टक्क्यांहून अधिक तरुणांना उत्तम करिअर आणि जास्त पैसा कमवण्यासाठी परदेशात स्थायिक व्हायचे आहे. हा रिपोर्ट देशभरातील सुमारे 8000 तरुणांशी केलेल्या सविस्तर चर्चेवर आधारित असून भारतीय गुणवत्तेचा कल आता जागतिक स्तरावर कसा बदलत आहे, याचे वास्तव दर्शवतो. आर्थिक प्रगतीची ही ओढ तरुणांना आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून नवीन संधी शोधण्यासाठी प्रवृत्त करत आहे.

दरम्यान, या सर्वेक्षणातून समोर आलेले निष्कर्ष अतिशय बोलके आहेत. तरुणांना परदेशात जाण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या कारणांमध्ये 'आर्थिक विकास' हे सर्वात मोठे कारण ठरले. सुमारे 46 टक्के तरुणांनी जास्त पगार आणि आर्थिक सुबत्ता मिळवणे हेच आपले मुख्य ध्येय असल्याचे सांगितले, तर 34 टक्के तरुणांनी आपल्या करिअरमधील प्रगतीसाठी परदेशाचा मार्ग निवडणे पसंत केले. यावरुन हे स्पष्ट होते की, सध्याच्या काळात परदेशात जाण्याची ही लाट केवळ जीवनशैली बदलण्यासाठी किंवा फिरण्यासाठी नसून त्यामागे ठोस आर्थिक प्रगतीचे उद्दिष्ट आहे. जागतिक स्तरावर मिळणारा कामाचा अनुभव आणि स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्याची जिद्द तरुणांना सातासमुद्रापार घेऊन जात आहे.

Abroad Career Trends
Narendra Modi Resolutions: PM मोदींचा गोवा दौरा आणि त्यांचे 9 संकल्प तडीस नेण्याचे आव्हान

परदेशातील पसंतीच्या देशांच्या बाबतीतही या अहवालात एक मोठा बदल पाहायला मिळत आहे. एकेकाळी भारतीयांचे सर्वात आवडते ठिकाण असलेला अमेरिका (America) आता या शर्यतीत मागे पडला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, 43 टक्के तरुणांच्या पसंतीसह 'जर्मनी' हा देश आता प्रथम क्रमांकावर आहे. जर्मनीपाठोपाठ 17 टक्के तरुणांनी युनायटेड किंगडमला (UK) पसंती दिली आहे, तर 9 टक्के तरुण जपानला आपली पुढची कर्मभूमी म्हणून पाहत आहेत. एकेकाळी स्वप्नांचा देश मानला जाणारा अमेरिका आता केवळ 4 टक्के तरुणांच्या पसंतीस उतरला आहे, जे जागतिक मागणी आणि संधींचे बदलते स्वरुप दर्शवते.

Abroad Career Trends
PM Modi Goa Visit: 'श्रीकृष्ण जसे विचार करत होते, तसे PM मोदीही सर्वसमावेशक विचार करतात'; विद्याधीश स्वामींचे गौरवोदगार

विशेष म्हणजे, आरोग्य सेवा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या विशेषतः नर्सच्या स्थलांतराबद्दल रिपोर्टमध्ये एक महत्त्वाचे निरीक्षण नोंदवण्यात आले. परदेशात जाणाऱ्या एकूण नर्सपैकी 61 टक्के नर्स या मोठ्या महानगरांमधील नसून त्या लहान शहरे आणि ग्रामीण भागातून (टियर 2 आणि टियर 3 शहरे) आहेत. दिल्ली-एनसीआर क्षेत्रातून 17 टक्के नर्स स्थलांतर करतात, तर दक्षिण आणि ईशान्य भारतातील तरुणांचे योगदानही यात मोठे आहे. हे जागतिक आरोग्य यंत्रणेत भारतीय ग्रामीण टॅलेंटची वाढती मागणी आणि पोहोच सिद्ध करते.

Abroad Career Trends
PM Narendra Modi Goa visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी गोव्यात; श्रीरामांच्या मूर्तीचं करणार अनावरण, लोटणार भक्तांचा 'पूर'; भव्य कार्यक्रमांचे आयोजन

परदेशात जाण्याची प्रबळ इच्छा असली तरी तरुणांसमोर अनेक आव्हाने उभी आहेत. 44 टक्के तरुणांसाठी परदेशी भाषेची अट हे आजही सर्वात मोठे संकट आणि अडथळा ठरत आहे. याव्यतिरिक्त, आंतरराष्ट्रीय भरती प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव ही दुसरी गंभीर समस्या आहे. सुमारे 48 टक्के तरुणांनी भरती प्रक्रियेदरम्यान अनैतिक पद्धती आणि फसवणुकीचा अनुभव आल्याचे सांगितले. योग्य मार्गदर्शनाचा अभाव, स्थलांतराचा प्रचंड खर्च आणि जटिल प्रक्रिया यामुळे अनेक तरुणांची परदेशवारीची स्वप्ने धुळीस मिळत आहेत. भारतीय टॅलेंटचा हा ओढा जागतिक बाजारपेठेसाठी फायदेशीर असला तरी देशांतर्गत स्तरावर ही 'ब्रेन ड्रेन' रोखणे हे भविष्यातील मोठे आव्हान असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com