किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

Mahesh Desai Team India Manager: गोवा क्रिकेट असोसिएशनचे (GCA) अध्यक्ष आणि माजी रणजीपटू महेश देसाई यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) मोठी जबाबदारी सोपवली.
Mahesh Desai Team India Manager
Mahesh Desai Team India ManagerDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोवा क्रिकेट असोसिएशनचे (GCA) अध्यक्ष आणि माजी रणजीपटू महेश देसाई यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) मोठी जबाबदारी सोपवली. आगामी भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील मालिकेसाठी भारतीय संघाचे 'टीम मॅनेजर' म्हणून देसाई यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीमुळे गोव्याच्या क्रीडा वर्तुळात आनंदाचे वातावरण असून राष्ट्रीय स्तरावर गोव्याचा मान उंचावला आहे.

बीसीसीआयने सोपवली मोठी जबाबदारी

न्यूझीलंडचा संघ सध्या भारत (India) दौऱ्यावर असून या मालिकेतील सामन्यांच्या नियोजनात आणि व्यवस्थापनात महेश देसाई यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे. बीसीसीआयने त्यांच्या अनुभवावर विश्वास दाखवत ही नियुक्ती केली आहे. संघ व्यवस्थापक म्हणून भारतीय संघाच्या खेळाडूंचे नियोजन, सराव सत्रे आणि तांत्रिक गरजांची पूर्तता करण्याची जबाबदारी आता देसाई यांच्या खांद्यावर असेल.

Mahesh Desai Team India Manager
Virat Kohli Viral Post: विराट कोहलीचा दोन वर्षांनंतर मोठा निर्णय; सोशल मीडियावरील 'त्या' पोस्टनं खळबळ!

महेश देसाई: एक यशस्वी क्रिकेट प्रवास

महेश देसाई यांनी गेल्या वर्षीच गोवा क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे. ते गोव्याचे माजी रणजी खेळाडू असून 1985-86 च्या काळात त्यांनी राज्याचे प्रतिनिधित्व केले आहे. विशेष म्हणजे 2017 मध्ये नवी दिल्ली येथील फिरोजशाह कोटला मैदानावर झालेल्या भारत-न्यूझीलंड टी-20 सामन्यातही त्यांनी 'मॅच ऑब्झर्व्हर' म्हणून काम पाहिले होते. त्यांच्या या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा आता भारतीय संघाला होणार आहे.

Mahesh Desai Team India Manager
Virat Kohli: नव्या वर्षाचा नवा विक्रम! 2026 च्या पहिल्याच मालिकेत किंग कोहली इतिहास रचण्यासाठी सज्ज

गोव्याच्या क्रिकेटला मिळणार चालना

महेश देसाई यांच्या या नियुक्तीमुळे गोव्यातील तरुण खेळाडूंना आणि क्रिकेट प्रेमींना प्रेरणा मिळणार आहे. यापूर्वी त्यांचे मोठे भाऊ चेतन देसाई यांनी देखील भारतीय संघाचे व्यवस्थापक म्हणून काम पाहिले होते. आता महेश देसाई यांना मिळालेली ही संधी गोव्यातील (Goa) क्रिकेट प्रशासनासाठी आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरेल, असे मानले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com