World Cup 2023: 'बर्थ डे बॉय' हार्दिकची बॉलिंग अन् शार्दुल ठाकूरचा बाउंड्रीवर भन्नाट कॅच, पाहा Video

Shardul Thakur Catch: अफगाणिस्तानविरुद्ध वर्ल्डकपमधील सामन्यात शार्दुल ठाकूरने बाउंड्रीवर अफलातून झेल घेतला होता.
Hardik Pandya - Shardul Thakur
Hardik Pandya - Shardul ThakurBCCI and ICC
Published on
Updated on

ICC ODI Cricket World Cup 2023, India vs Afghanistan, Shardul Thakur:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात रविवारी सामना होत आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, या सामन्यात शार्दुल ठाकूरने घेतलेला झेल चर्चेत राहिला.

या सामन्यात अफगाणिस्तानकडून रेहमनुल्लाह गुरबाज आणि इब्राहिम झाद्रान यांनी डावाची सुरुवात केली. त्यांनी सुरुवातीला सकारात्मक खेळ केला होता. मात्र, सहाव्या षटकात झाद्रानला बुमराहने 22 धावांवर बाद केले.

Hardik Pandya - Shardul Thakur
World Cup 2023: वर्ल्ड कपमध्ये 'या' बाबतीत श्रीलंका संघ ठरला नंबर वन, भारताचा मोडला रेकॉर्ड !

त्यानंतर 13 व्या षटकात आपला 30 वा वाढदिवस साजरा करणारा हार्दिक पंड्या गोलंदाजीसाठी आला. यावेळी त्याने टाकलेल्या चौथ्या चेंडूने उसळी घेतली, ज्यावर गुरबाजने पुल शॉट खेळला, पण त्याच्या बॅटच्या वरच्या बाजूला चेंडू लागला आणि दूर गेला.

त्याचवेळी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगजवळी क्षेत्ररक्षण कराणाऱ्या शार्दुल ठाकूरने झेल घेतला, पण त्याचेवळी त्यांचे स्वत:वर पूर्ण नियंत्रण नसल्याने तोल जाऊन तो बाउंड्रीच्या बाहेर जात होता. त्यामुळे त्याने बाउंड्री बाहेर जाण्याआधी हातात असलेला चेंडू हवेत फेकला आणि नंतर स्वत:वर नियंत्रिण मिळवत झेल घेतला. त्यामुळे गुरबाजला 21 धावांवर बाद व्हावे लागले.

Hardik Pandya - Shardul Thakur
Cricket World Cup: भारत-पाक सामन्यावरील विघ्न टळले, नरेंद्र मोदी स्टेडियमवर हल्ल्याची धमकी देणारा गजाआड

दरम्यान, या सामन्यासाठी शार्दुल ठाकूरला आर अश्विनच्या जागेवर भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली आहे. त्याला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात खेळवण्यात आले नव्हते. मात्र, त्याला अफगाणिस्तानविरुद्ध संधी देण्यात आली.

असे आहेत दोन्ही संघांचे प्लेइंग इलेव्हन -

  • भारत - रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

  • अफगाणिस्तान - रहमानउल्ला गुरबाज(यष्टीरक्षक), इब्राहिम झद्रान, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी(कर्णधार), नजीबुल्ला झद्रान, मोहम्मद नबी, अजमातुल्ला ओमरझाई, रशीद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक, फजलहक फारुकी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com