Asian Games  Dainik Gomantak
क्रीडा

Asian Games मध्ये चीनची मनमानी? नीरज-ज्योतीसह भारतीय खेळाडूंविरुद्ध झाला अन्याय

Asian Games: चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंविरुद्ध अन्याय केला जात असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

Pranali Kodre

Is China trying to cheat against Indian athletes in 19th Asian Games Hangzhou?

चीनमध्ये १९ वी आशियाई क्रीडा स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी सुरुवातीपासूनच शानदार कामगिरी करत आत्तापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आहे. अशातच एक वाद चिघळताना दिसत आहे.

चीनच्या अधिकाऱ्यांकडून भारतीय खेळाडूंविरुद्ध अन्याय केला जात असल्याची चर्चा होताना दिसत आहेत. त्यातही गेल्या २ दिवसापासून ही गोष्ट प्रकर्षाने समोर येत आहे.

बुधवारी या स्पर्धेच्या ११ व्या दिवशी पुरुषांची भालाफेक सुरू असताना भारताच्या नीरज चोप्राने पहिल्या प्रयत्नात जेव्हा भाला फेकला, तेव्हा तो साधारण ८७ मीटरच्या आसपास लांब गेला होता, मात्र त्यावेळी त्याचे अंतर मोजताना गोंधळ झाला आणि तांत्रिक अडचण सांगत त्याला पुन्हा भाला फेकण्यास सांगण्यात आले.

त्यानंतर मात्र त्याला त्या प्रयत्नात ८२.३८ मीटरच भाला फेकता आला. मात्र नंतर त्याने त्याच्या ८८.८८ मीटर भाला फेकत अव्वल स्थान मिळवले.

याच स्पर्धेत किशोर जेनालाही भालाफेक करताना त्याचा दुसरा प्रयत्न चूकीच्या पद्धतीने फाऊल ठरवण्यात आला होता. मात्र नंतर जेनानेही चौथ्या प्रयत्नात ८७.५४ मीटर भाला फेकला आणि रौप्य पदक जिंकले.

याआधी दोन दिवसांपूर्वी भारताची धावपटू ज्योती यार्राजी हिच्याही बाबतीत बराच गोंधळ झालेला दिसला. ती १०० मीटर हर्डल शर्यतीत सहभागी झालेली असताना चीनच्या यानी वू हिच्यासह तिला अपात्र ठरवण्यात आले होते, पण त्यावर तिने दाद मागितली.

अखेर बऱ्याच वादानंतर तिला पात्र ठरवले गेले. तसेच चीनच्या वू कडून चूकीची सुरुवात झाली असल्याचे मान्य करण्यात आले. ज्योतीने या स्पर्धेत रौप्य पदक जिंकले.

याशिवाय देखील स्पर्धेच्या सुरुवातीलाच अरुणाचल प्रदेशमधील तीन वुशूच्या खेळाडूंना चीनमध्ये प्रवेश नाकारण्यात आला होता. त्याचबरोबर बॉक्सिंग, तलवारबाजी, ऍथलेटिक्स अशा खेळांमध्येही भारतीय खेळाडूंविरुद्ध अन्याय झाल्याची चर्चा होत आहे.

त्यामुळे सध्या भारतीय क्रीडा चाहत्यांमध्ये चीनच्या व्यवस्थापना विरुद्ध नाराजीचा सूर दिसून येत आहे.

दरम्यान, भारताने ११ व्या दिवसाखेरपर्यंत ८१ पदके जिंकली आहेत, ही आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासातील भारताची सर्वोत्तम कामगिरी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

मुंबईत मराठी माणूस खरंच श्रीमंत झाला की फक्त 'उपरा'? 25 वर्षांच्या सत्तेचा लेखाजोखा अन् वास्तव; आगामी निवडणुकीत कोणाला कौल?

SCROLL FOR NEXT