Asian Games: हॉकीत गोल्ड मेडलची संधी! भारतीय संघाचा कोरियाला नमवत दणक्यात फायनलमध्ये प्रवेश

Indian Hockey team: भारतीय पुरुष हॉकी संघाने अंतिम सामन्यात प्रवेश केल्याने आशियाई क्रीडा स्पर्धेत चौथ्यांदा सुवर्ण पदक जिंकण्याची संधी त्यांच्याकडे आहे.
Hockey India
Hockey IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

India men's Hockey Team secured Medal in 19th Asian Games Hangzhou, China:

चीनमधील होंगझाऊ येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी विक्रमी कामगिरी केली आहे. या स्पर्धेत 11 व्या दिवशी म्हणजेच बुधवारी भारताच्या पुरुष हॉकी संघानेही शानदार कामगिरी करत पदक पक्के केले आहे.

बुधवारी भारतीय हॉकी संघाने उपांत्य फेरीत कोरियाला 5-3 अशा गोल फरकाने पराभूत केले. याबरोबरच भारताने अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. आता 6 ऑक्टोबर रोजी भारतीय संघ सुवर्ण पदाकासाठी अंतिम सामना खेळेल. चीन आणि जपान यांच्यातील उपांत्य फेरीतील सामन्यात विजय मिळवणाऱ्या संघाविरुद्ध भारताला अंतिम सामना खेळावा लागणार आहे.

बुधवारी भारताकडून हार्दिक सिंग (5'), मनदीप सिंग (11'), ललित उपाध्याय (15'), अमित रोहिदास (24') आणि अभिषेक (54') यांनी गोल केले. तसेच कोरियाकडून तिन्ही गोल मांजी जंग याने केले.

Hockey India
Asian Games: पारुल, अन्नू राणीची सुवर्ण कामगिरी, भारतीय खेळाडूंची 10 व्या दिवशीही पदकांची लयलूट

भारताकडून पहिल्याच क्वार्टरमध्ये हार्दिक, मनदीप आणि ललित यांनी गोल करत आघाडी घेतली होती. तसेच दुसऱ्या क्वार्टरमध्ये जंगने दोन गोल करत भारताची आघाडी कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ललितने भारताचा चौथा गोल नोंदवत ही आघाडी आणखी वाढवली. त्यामुळे पहिला हाफ संपला तेव्हा भारताने 4-2 अशी आघाडी घेतली होती.

त्यानंतर दुसऱ्या हाफमध्ये कोरियाने खेळ उंचावला. तिसऱ्य क्वार्टरमध्ये भारताला गोलची संधी मिळाली नाही, मात्र जंगने एक गोल करत भारताची आघाडी कमी केली. मात्र अखेरच्या क्वार्टरमध्ये अभिषेकने गोल नोंदवला, या क्वार्टरमध्ये कोरियाला गोल करता आला नाही. त्यामुळे भारताने हा सामना 5-3 असा जिंकला.

Hockey India
Asian Games: 'पदक जिंकताच...', नंदिनीचे स्वप्ना बर्मनने केलेल्या ट्रान्सजेंडरच्या आरोपावर प्रत्युत्तर

भारताचा चौथ्या सुवर्णपदकासाठी प्रयत्न

दरम्यान, भारतीय पुरुष हॉकी संघ यंदा आशियाई क्रीडा स्पर्धेतील चौथे सुवर्ण, तर एकूण १६ वे पदक मिळवण्याच्या हेतूने खेळत आहे.

भारतीय संघाने यापूर्वी 1966, 1998 आणि 2014 साली एशियाडमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. तसेच 1958, 1962, 1970, 1974, 1978, 1982, 1990, 1994 आणि 2002 साली रौप्य पदक जिंकले होते. त्याचबरोबर 1986, 2010 आणि 2018 मध्ये कांस्य पदक जिंकले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com