Gold for Neeraj Chopra and Silver for Kishore Jena in Men's Javelin at 19th Asian Games Hangzhou, China:
चीनमध्ये सुरू असेलल्या १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत बुधवारी (४ ऑक्टोबर) भारतीय खेळाडूंची सुरुवातीपासूनच पदकांची लयलूट सुरू आहे. दरम्यान बुधवारी भालाफेकीत भारताच्या नीरज चोप्रा आणि किशोर कुमार जेना यांनी अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदकाला गवसणी घातली.
नीरजने ८८.८८ मीटर भालाफेक करत सुवर्णपदकावर नाव कोरले, तर किशोर जेनाने ८७.५४ मीटर भालाफेक करत रौप्य पदक जिंकले. नीरजची ही या हंगामातील सर्वोत्तम फेक होती, तर किशोरची ही वैयक्तिक सर्वोत्तम फेक ठरली. या स्पर्धेत जपानचा रोडेरिक जेन्की डिनने कांस्य पदक जिंकले.
भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या नीरजने आशियाई क्रीडा स्पर्धेत दुसऱ्यांदा सुवर्णपदकावर मोहोर उमटवली आहे. त्याने जकार्ताला २०१८ साली झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही सुवर्णपदकाला गवसणी घातली होती.
दरम्यान, मंगळवारी आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांची भालाफेक स्पर्धा पार पडली. यात भारताच्याच अन्नू राणीने सुवर्णपदकाला गवसणी घातली. तिने 62.92 मीटर भालाफेक करत सुवर्ण पदक जिंकले. या हंगामातील ही तिची सर्वोत्तम कामगिरीही ठरली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.