India vs Ireland Dainik Gomantak
क्रीडा

IRE vs IND, 1st T20I: भारताकडून रिंकू सिंगबरोबरच 'या' बॉलरचेही पदार्पण, पाहा दोन्ही संघांची 'प्लेइंग-11'

आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात भारताने नाणेफेक जिंकली असून दोन भारतीय खेळाडूंचेही पदार्पण या सामन्यातून झाले आहे.

Pranali Kodre

Ireland vs India, 1st T20I, Playing XI: आयर्लंड विरुद्ध भारत यांच्यात ३ सामन्यांची टी२० मालिका शुक्रवारपासून सुरू झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी मलाहाईड, डब्लिन येथे होणार आहे. द व्हिलेज मैदानावर होणाऱ्या या सामन्यात भारताचा कर्णधार जसप्रीत बुमराहने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यातून भारताकडून रिंकू सिंग आणि प्रसिद्ध कृष्णा या दोन खेळाडूंचे आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण झाले आहे. दरम्यान रिंकूचे हे आंतरराष्ट्रीय पदार्पणही ठरले आहे. तो भारताकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा भारताचा ३९७ वा खेळाडू ठरला आहे.

तसेच आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा प्रसिद्ध कृष्णा भारताचा १०६ वा खेळाडू आणि रिंकू सिंग १०७ वा खेळाडू ठरला आहे. या दोघांनाही पदार्पणाची कॅप जसप्रीत बुमराहने दिली.

तसेच आयर्लंडने या सामन्यासाठी क्रेग यंगला संधी दिली आहे. त्याचबरोबर पुढीलवर्षी होणाऱ्या टी२० वर्ल्डकपच्या दृष्टीने आयर्लंड या मालिकेतून सुरुवात करणार आहे.

दोन्ही संघातील आमने-सामने आकडेवारीचा विचार करायचा झाल्यास आत्तापर्यंत या दोन्ही संघात ५ टी२० सामने खेळवण्यात आले असून हे पाचही सामने भारतीय संघाने जिंकले आहेत.

असे आहेत प्लेइंग इलेव्हन -

  • भारत - ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, रिंकू सिंग, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह (कर्णधार), रवी बिश्नोई

  • आयर्लंड - पॉल स्टर्लिंग (कर्णधार), अँड्र्यू बालबर्नी, लॉर्कन टकर (यष्टीरक्षक), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, मार्क अडायर, बॅरी मॅककार्थी, क्रेग यंग, ​​जोशुआ लिटल, बेंजामिन व्हाइट

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: ट्रेनसमोर अचानक आली अन्...; महिलेचा थरारक ड्रामा व्हायरल; नेटकरी म्हणाले, "ही लोको पायलटची बायको तर नाही ना?"

Karnataka Accident: कर्नाटकात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! ट्रक-क्रूझरच्या भीषण धडकेत 6 तरुणांचा जागीच मृत्यू; 3 जण मृत्यूशी देतायेत झुंज

ENG vs IND: "तिलक वर्माला डच्चू द्या, संजू सॅमसनला खेळवा!" इंग्लंडविरुद्धच्या सलग पराभवानंतर माजी भारतीय कर्णधाराने साधला निशाणा; मॅनेजमेंटला घेतलं फैलावर

Ganesh Idol: विसर्जनानंतर किनाऱ्यांवर 'गणेशमूर्तीं'ची होणारी विटंबना, यंदा तरी कठोर कारवाई होणार का?

Zodiac Personality Traits: खिशाला कात्री लावणे यांच्या रक्तातच नाही! 'या' 3 ग्रहांचे राजे पैशांच्या बाबतीत का असतात एवढे कडक?

SCROLL FOR NEXT