T20 विश्वचषक दोन वेळा जिंकलेल्या वेस्ट इंडिजला आयर्लंडने मोठा झटका बसला आहे. टी-20 विश्वचषकाच्या पात्रता फेरीत आयर्लंडकडून पराभूत झाल्यानंतर वेस्ट इंडिज T20 विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडला. आयर्लंडने वेस्ट इंडिजचा 9 गडी राखून पराभव केला. वेस्ट इंडिजने 2012 आणि 2016 मध्ये दोनदा विश्वचषक जिंकला आहे. दोनवेळा विश्वविजेत्या ठरलेल्या संघाला आयर्लंडने बाहेरचा रस्ता दाखवल्याने सर्वांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
वेस्ट इंडिजचा कर्णधार निकोलस पूरनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजने आयर्लंडसमोर विजयासाठी 147 धावांचे लक्ष्य ठेवले होते. विंडीज संघाकडून ब्रेंडन किंगने सर्वाधिक 62 धावांची खेळी केली. आयर्लंडच्या गॅरेथ डेलनीने चार षटकांत 16 धावांत 4 फलंदाज बाद केले.
वेस्ट इंडिजने विजयासाठी दिलेल्या 148 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या आयर्लंडने 17.3 षटकांत आव्हान पूर्ण केले. दरम्यान, संघाचा फक्त एकच गडी बाद झाला. पात्रता फेरीत बाद झाल्यामुळे वेस्ट इंडिज संघ T20 विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडला आहे. क्रिकेट जगतात हा मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान, यापूर्वी देखील आयर्लंड संघाने दमदार कामगिरी करत सर्वांना आश्चर्यचकीत केले होते. 2007 च्या एकदिवसीय विश्वचषकात पाकिस्तानला पराभूत करून त्याने स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवला होता. त्याचप्रमाणे त्याने 2011 च्या एकदिवसीय विश्वचषकातून इंग्लंडला बाहेर काढले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.