Senior T20 Cricket
Senior T20 CricketDainik Gomantak

Senior T20 Cricket: फलंदाजीत गोव्याची समस्या कायम

दिल्लीचा सहा विकेट राखून सहज विजय
Published on

पणजी: गोव्याच्या सीनियर पुरुष संघाची झटपट क्रिकेटमध्ये वेगाने धावा काढण्याची समस्या कायम राहिल्यामुळे गुरुवारी आणखी एक पराभव पत्करावा लागला. सय्यद मुश्ताक अली करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेत त्यांना दिल्लीने तीन षटके आणि सहा विकेट राखून सहजपणे हरविले.

(Delhi team defeated Goa in senior T20 cricket tournament)

Senior T20 Cricket
Goa News: सेपेकटॅकरो फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी बाबू कवळेकर यांची बिनविरोध निवड

जयपूर येथील सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या लढतीत गोव्याने प्रथम फलंदाजी केली. त्यांना 20 षटकांत 6 बाद 131 धावाच करता आल्या. नंतर अर्जुन तेंडुलकरने डावातील पहिल्याच चेंडूवर दिल्लीच्या सलामीवीरास त्रिफळाचीत बाद केले, तरीही त्यांनी विजयी लक्ष्य सहजपणे गाठले. 17 षटकांत 4 बाद 133 धावा करून दिल्लीने सामना जिंकला.

गोव्याचा हा सहा लढतीतील तिसरा पराभव ठरला. त्यांनी अन्य तीन लढती जिंकल्या असून साखळी फेरीतील शेवटचा सामना शनिवारी (ता. 22 ) पुदुचेरीविरुद्ध होईल.

गोव्याच्या डावात दीपराज गावकरने सर्वाधिक 40 (32 चेंडू, 4 चौकार, 1 षटकार) केल्या. त्याने तिसऱ्या विकेटसाठी कर्णधार स्नेहल कवठणकर याच्यासह 59 धावांची भागीदारी केली. दोघेही सहा धावांच्या अंतराने बाद झाल्यामुळे गोव्याचे मोठे नुकसान झाले.

Senior T20 Cricket
Goa News: सरकारला शेवटची मुदत! मडगाव न्यायालयाच्या जुन्या इमारतींची 90 दिवसात दुरुस्ती करा अन्यथा..

गोव्याने पहिल्या 11 षटकांच्या खेळात 77 धावा केल्या, मात्र नंतरच्या नऊ षटकांत फक्त 54 धावाच करता आल्या. त्यामुळे मोठी धावसंख्या रचणे गोव्याला शक्य झाले नाही.

संक्षिप्त धावफलक

गोवा: २० षटकांत ६ बाद १३१ (स्नेहल कवठणकर २०, एकनाथ केरकर ०, अर्जुन तेंडुलकर १५, दीपराज गावकर ४०, सुयश प्रभुदेसाई ४, सिद्धेश लाड २०, दर्शन मिसाळ नाबाद १३, तुनीष सावकार नाबाद १२, नवदीप सैनी २-३४, कुलवंत खेजरोलिया १-१९, शिवांक वशिष्ठ १-१८, नीतिश राणा १-१५, योगेश शर्मा १-१७) पराभूत वि. दिल्ली ः १७ षटकांत ४ बाद १३३ (यश धुल ४६, अनुज रावत ११, नीतिश राणा नाबाद ४९, आयुष बदोनी नाबाद २०, अर्जुन तेंडुलकर ३-०-२८-१, लक्षय गर्ग ३-०-३१-१, अमित यादव ४-०-२२-२, दर्शन मिसाळ २-०-१३-०, अमूल्य पांड्रेकर २-०-१२-०, वेदांत नाईक १-०-६-०, सिद्धेश लाड २-०-२१-०).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com