IND Vs PAK: टीम इंडिया पाकिस्तानात जाणार? BCCI प्रमुखांचे मोठे वक्तव्य

India vs Pakistan: आशिया कप 2023 पाकिस्तानात होणार आहे.
Team India
Team IndiaDainik Gomantak

Roger Binny On Asia Cup 2023: आशिया कप 2023 पाकिस्तानात होणार आहे. मात्र यावरुन आता भारत आणि पाकिस्तानमध्ये वाद सुरु झाला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सांगितले होते की, 'टीम इंडिया आशिया कप 2023 स्पर्धेसाठी पाकिस्तानचा दौरा करणार नाही.' यानंतर पीसीबीने 2023 विश्वचषकासाठी आपला संघ भारतात पाठवणार नसल्याचे सांगितले आहे. आता बीसीसीआयचे प्रमुख रॉजर बिन्नी यांनी या मुद्द्यावर मोठे वक्तव्य केले आहे.

रॉजर बिन्नी यांनी हे वक्तव्य केले

टीम इंडिया (Team India) पाकिस्तानात जाण्याच्या प्रश्नावर बीसीसीआयचे अध्यक्ष म्हणाले की, 'तो आमचा कॉल नाही. आमच्या संघाने कुठे जायचे हे आम्ही सांगू शकत नाही. आपण देश सोडल्यास किंवा इतर देश इथे आले तर आपल्याला सरकारकडून मान्यता घ्यावी लागते. हा निर्णय आम्ही स्वतः घेऊ शकत नाही, आम्हाला सरकारवर विश्वास ठेवावा लागेल. भारत सरकारचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल.'

Team India
IND Vs PAK: '...पाकिस्तानमध्ये हिंमत नाही', या दिग्गजाने केला मोठा दावा

बीसीसीआय सचिवांनी ही माहिती दिली

बीसीसीआयचे (BCCI) सचिव जय शाह यांनी एका निवेदनात म्हटले होते की, 'भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेसाठी सीमा ओलांडणार नाही.' यावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने उत्तर दिले की, 'आम्हीही विश्वचषकात सहभागी होण्यासाठी भारतात जाणार नाही.'

पीसीबीने प्रत्युत्तर दिले

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्या वक्तव्याबद्दल चिंता व्यक्त करताना, पीसीबीने म्हटले की, "पुढील वर्षी होणारा आशिया चषक तटस्थ ठिकाणी हलवण्याबाबत एसीसीचे अध्यक्ष श्री. जय शहा यांनी काल केलेल्या वक्तव्यांमुळे पीसीबीला धक्का बसला आहे. आशियाई क्रिकेट परिषद (ACC) किंवा पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) यांच्याशी चर्चा किंवा सल्लामसलत न करता हे वक्तव्य केले गेले."

Team India
IND Vs PAK: हिट मॅनचा पाकिस्तानविरुद्ध जबरदस्त प्लॅन, सामन्यापूर्वी केला खुलासा

तसेच, भारत आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यातील सामना 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्नवर होणार आहे. याबाबत दोन्ही देशांचे चाहते खूप उत्सुक आहेत. गेल्या टी-20 विश्वचषकात पाकिस्तानने 10 गडी राखून विजय मिळवला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com