RCB Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: राजस्थानवर बेंगलोरचे 'रॉयल्स' भारी! विराटसेनेने चिन्नास्वामीवर फडकवली विजयी पताका

आयपीएल २०२३ स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने राजस्थान रॉयल्सला अखेरच्या षटकात पराभवाचा धक्का दिला.

Pranali Kodre

Royal Challengers Bangalore vs Rajasthan Royals: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत रविवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात एम चिन्नास्वामी स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात बेंगलोरने अखेरच्या षटकात 7 धावांनी विजय मिळवला.

या सामन्यात बेंगलोरने राजस्थानसमोर विजयासाठी 190 धावांचे आव्हान ठेवले होते. पण राजस्थान रॉयल्सला 20 षटकात 6 बाद 182 धावाच करता आल्या.

या सामन्यात राजस्थानकडून यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलर यांनी सुरुवात केली होती. पण पहिल्याच षटकात मोहम्मद सिराजने बटलरला शुन्यावर बाद करत राजस्थानला मोठा धक्का दिला. मात्र, त्यानंतर जयस्वाल आणि पडिक्कल यांनी डाव सांभाळताना 98 धावांची भागीदारी केली होती. या भागीदारीदरम्यान पडिक्कलने अर्धशतकही केले.

मात्र, त्याच्या अर्धशतकांनंतर लगेचच त्याने 12 व्या षटकात डेव्हिड विलीच्या गोलंदाजीवर विकेट गमावली. त्याचा झेल 34 चेंडूत 52 धावांची खेळी केल्यानंतर विराट कोहलीने घेतला. पडिक्कलने या खेळीत 7 चौकार आणि 1 षटकार मारले. त्याच्यानंतर लगेचच हर्षल पटेलने यशस्वी जयस्वालला देखील बाद केले. त्याचाही झेल विराटनेच घेतला. जयस्वाल 37 चेंडूत 47 धावा करून बाद झाला.

यानंतर मात्र, राजस्थानची लय बिघडली. संजू सॅमसनही 15 चेंडूत 22 धावा करून बाद झाला, तर शिमरॉन हेटमायर 9 चेंडूत 3 धावा करून धावबाद झाला. दरम्यान, ध्रुव जुरेलने राजस्थानला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. पण तो अपयशी ठरला. तो सामना संपला तेव्हा 16 चेंडूत 34 धावांवर नाबाद राहिला.

बेंगलोरकडून हर्षल पटेलने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराज आणि डेव्हिड विली यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

तत्पूर्वी,प्रथम फलंदाजी करणाऱ्या बेंगलोरची सुरुवात फारशी चांगली झाली नव्हती. डावाच्या पहिल्याच चेंडूवर त्यांनी विराट कोहलीची विकेट गमावली. विराटला ट्रेंट बोल्टने शुन्यावर माघारी धाडले. बोल्टने डावाच्या तिसऱ्या षटकात शाहबाज अहमदलाही 2 धावांवर बाद केले.

मात्र, त्यानंतर फाफ डू प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांची जोडी जमली. या दोघांनी आक्रमक फलंदाजी करताना शतकी भागीदारीही केली. दरम्यान दोघांचे अर्धशतकही झाले. पण 14 व्या षटकात फाफ डू प्लेसिस यशस्वी जयस्वालने केलेल्या थ्रोवर धावबाद झाला. फाफने 39 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकारांसह 62 धावांची खेळी केली.

त्याच्या पुढच्याच षटकात मॅक्सवेलही बाद झाला. मॅक्सवेलने 44 चेंडूत 77 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये त्याने 6 चौकार आणि 4 षटकार मारले. हे दोघे बाद झाल्यानंतर मात्र केवळ दिनेश कार्तिकला 10 धावांचा टप्पा पार करता आला. तो अखेरच्या षटकात 16 धावा करून बाद झाला. त्यामुळे बेंगलोरने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 बाद 189 धावा केल्या.

राजस्थानकडून ट्रेंट बोल्ट आणि संदीप शर्मा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच आर अश्विन आणि युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

विवोने पुन्हा केला मोठा धमाका! दमदार बॅटरी, प्रोसेसरसह Vivo V60 5G लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि अफलातून फीचर्स

Cancer: महिलांनो सावधान! गर्भनिरोधक गोळ्या वाढवतायेत कॅन्सरचा धोका? जाणून घ्या तज्ञांचा सल्ला अन् खबरदारीचे उपाय

AUS vs SA 2nd T20: दक्षिण आफ्रिकेची ऑस्ट्रेलियावर 'विराट' मात! मोडला आपलाच रेकॉर्ड; गोलंदाजांनी बजावली महत्त्वाची भूमिका

Viral Video: पुराच्या पाण्यातून ट्रॅक्टर घेऊन जाण्याचा जीवघेणा स्टंट, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल; नेटकरी व्यक्त करतायेत संताप

Dewald Brevis Century: क्रिकेटचा नवा तारा, डेवाल्ड ब्रेव्हिसने टी-20 मध्ये शतक ठोकून रचला इतिहास, अनेक विक्रम मोडले

SCROLL FOR NEXT