IPL 2023 Dainik Gomantak
क्रीडा

वीस वर्षांत IPL चे मीडिया राईट्स 700 पटींनी महागणार, कंपन्यांना करावा लागणार अब्जावधींचा खर्च; चेअरमनचा दावा

IPL Media Rights: आयपीएलच्या मीडिया राईट्सबाबत चेअरमन अरुण धुमल यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

Pranali Kodre

IPL chairman Arun Dhumal hopes growth in media rights value close to $50 billion:

इंडियन प्रीमियर लीग अर्थाच आयपीएलची लोकप्रियता केवळ भारतातच नाही, जर जगभरात पाहायला मिळत आहे. आयपीएलमुळे भारतीय क्रिकेटमध्येही मोठ्या प्रमाणात पैसा आला, तसेच अनेक कानाकोपऱ्यातील खेळाडूंनाही एक प्लॅटफॉर्म आयपीएलमुळे तयार झाला आहे.

आता आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमल यांनी म्हटले आहे की पुढच्या दोन दशकात आयपीएलच्या मीडिया राईट्स 50 बिलियन डॉलर (जवळपास 4 लाख कोटी रुपये) पर्यंत पोहचू शकतात. म्हणजेत साधारण 700 पटींनी मीडिया राईट्स महागतील.

सध्या 2022 मधील करारानुसार पाच वर्षांसाठी आयपीएलच्या मीडिया राईट्सची किंमत 6.2 बिलियन डॉलर (साधारण 48,000 कोटी रुपये) आहे.

असे असले तरी सध्या आयपीएल जगभरातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मडागडी क्रीडा लीग आहे. अव्वल क्रमांकावर नॅशनल फुटबॉल लीग (NFL) आहे. नॅशनल फुटबॉल लीगने नुकताच 110 बिलियन डॉलरचा 11 वर्षांसाठी मीडिया करार केला आहे.

याबद्दल बीसीसीआयचे माजी खजिनदार अरुण धुमल बंगळुरूमध्ये झालेल्या आरसीबी इनोवेशन लॅब लीडर्स मीट इंडिया कार्यक्रमात म्हणाले, 'मी जर गेल्या 15 वर्षांचा विचार केला, तर मला पुढचा विचार करावा लागणार आहे. साधारण 2043 पर्यंत आम्ही साधारण 50 बिलियन डॉलरच्या आसपास मीडिया राईट्सची अपेक्षा करत आहोत.'

याशिवाय धुमल यांनी महिलांची चालू झालेली वूमन्स प्रीमियर लीग आणि 2028 मध्ये ऑलिम्पिकमध्ये खेळवण्यात येणारे क्रिकेट ही प्रगती असल्याचे म्हटले आहे.

ते म्हणाले, 'आम्हाला नाविण्यता आणत राहावी लागणार आहे. चाहत्यांमध्ये आवड रहावी यासाठी गोष्टी करण्यावर भर द्यावा लागणार आहे. तसेच सामन्यांमध्ये आणखी गुणवत्ता यावी यासाठी काम करावे लागणार आहे.'

'क्रिकेट आता ऑलिम्पिकचा भागही बनणार आहे आणि डब्ल्युपीएल देखील महिला क्रिकेटला वेगळ्या उंचीवर पोहचवत आहे. मला खूप आशा आहे आणि मला अंधाऱ्या बोगद्यानंतर प्रकाशह दिसत आहे.'

दरम्यान, जेव्हा आयपीएलला सुरुवात झाली होती, म्हणजेच 2008 मध्ये 6000 कोटी मीडिया राईट्स होते. त्यानंतर सातत्याने आयपीएलने प्रगती केली आहे. याबद्दल आयपीएल हा भारतीय ब्रँड असल्याचेही धुमल यांनी म्हटले.

आत्तापर्यंत आयपीएलचे 16 हंगाम खेळवण्यात आले आहेत. तसेच १७ व्या हंगामाचा लिलाव आता 19 डिसेंबर रोजी पार पडणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Betki: सफर गोव्याची! ‘झील सावई, बेतकी आवय’; थंड हवा आणि सुंदर मंदिरांनी सजलेले 'बेतकी'

धोकादायक वळण अन् चालकाची मस्ती! मुंबई-गोवा महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात; 2 प्रवाशांचा जागीच मृत्यू, 10 जणांची प्रकृती चिंताजनक

"आततायी विकासामुळे आणि बेपर्वाईमुळे झरींची परिस्थिती केविलवाणी झालेली आहे"; गोव्यातले जलस्रोत शेवटच्या घटका मोजत आहेत..

VIDEO: अभिषेक शर्माला राग नडला! मैदानात 'अश्लील शब्द' वापरल्यामुळे 'BCCI'चा मोठा दणका; मॅच फीमध्ये मोठी कपात

VIDEO: वीजांचा गडगडाट! गोव्यात जोरदार वाऱ्यासह पावसाची हजेरी; काही ठिकाणी झाडे कोसळली

SCROLL FOR NEXT