Yuzvendra Chahal Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2026 Vaping Controversy: ''चहलला जेलमध्ये टाका''! ई-सिगरेट प्रकरणावरुन माजी क्रिकेटपटू कडाडले; बीसीसीआयच्या मवाळ भूमिकेवर उपस्थित केला सवाल

Laxman Sivaramakrishnan on Yuzvendra Chahal: आयपीएल 2026 च्या हंगामात खेळाडूंच्या मैदानावरील कामगिरीपेक्षा त्यांच्या मैदानाबाहेरील वर्तणुकीमुळे मोठा वाद निर्माण झाला.

Manish Jadhav

IPL 2026 Vaping Controversy: आयपीएल 2026 च्या हंगामात खेळाडूंच्या मैदानावरील कामगिरीपेक्षा त्यांच्या मैदानाबाहेरील वर्तणुकीमुळे मोठा वाद निर्माण झाला. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग ड्रेसिंग रुममध्ये ई-सिगरेट (वेपिंग) वापरताना दिसला, त्यानंतर आता पंजाब किंग्सचा स्टार फिरकीपटू युझवेंद्र चहल एका व्हिडिओमध्ये ई-सिगरेटचा वापर करताना आढळून आला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी चहलवर सडकून टीका केली. यातच आता माजी भारतीय क्रिकेटपटू लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी याप्रकरणी अत्यंत आक्रमक भूमिका घेत चहलला तुरुंगात धाडण्याची मागणी केली.

लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपली नाराजी व्यक्त करताना बीसीसीआय आणि कायद्याच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी लिहिले की, "भारतात वेपिंगवर बंदी आहे, त्यामुळे अशा कृत्यासाठी संबंधिताला तुरुंगात असायला हवे. जर कायद्याची अंमलबजावणीच होणार नसेल, तर कायदे बनवण्याचा उपयोग काय? केवळ 25 टक्के मॅच फी कापणे ही कोणतीही मोठी शिक्षा नाही. जर हीच चूक एखाद्या सामान्य माणसाने केली असती, तर त्याच्यावर काय कारवाई झाली असती?" रियान परागवर बीसीसीआयने केवळ 25 टक्के दंड लावला, मात्र त्याच्यावर कोणतीही बंदी घातली गेली नाही, यावरुन शिवरामकृष्णन यांनी आपला संताप व्यक्त केला.

दुसरीकडे, या वाढत्या वादाची दखल घेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आता कडक पावले उचलण्यास सुरुवात केली. बीसीसीआयने आयपीएल संघ आणि खेळाडूंसाठी नवीन आणि कडक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. यानुसार, सर्व स्टेडियम, ड्रेसिंग रुम आणि डगआउट्समध्ये ई-सिगरेटच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी स्पष्ट केले की, जर अशा प्रकारची चूक खेळाडूंकडून पुन्हा झाली, तर त्यांच्यावर अधिक कठोर कारवाई केली जाईल. रियान परागनंतर आता बीसीसीआय युझवेंद्र चहलवर काय कारवाई करणार, की त्याला केवळ इशारा देऊन सोडले जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT