Phil Salt Superman Catch Video Dainik Gomantak
क्रीडा

VIDEO: हवेत झेप अन् एकहाती कॅच! फिल सॉल्ट बनला 'स्पायडरमॅन', इशान किशनचा घेतला अप्रतिम झेल; फील्डिंगचा सर्वात मोठा थरार

Phil Salt Superman Catch Video: फिल सॉल्टने हवेत झेप घेत पकडलेल्या एका अविश्वसनीय कॅचने इशान किशनला तंबूत धाडले आणि सामन्याचे पारडे फिरवले.

Manish Jadhav

Phil Salt Superman Catch Video: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2026 च्या पहिल्याच सामन्यात क्रिकेट चाहत्यांना थराराचा अनुभव आला. सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील या सलामीच्या लढतीत हैदराबादचा नवा कर्णधार इशान किशन याने मैदानावर चौफेर फटकेबाजी करत आरसीबीच्या गोलंदाजांची अक्षरशः पळता भुई थोडी केली.

नियमित कर्णधार पॅट कमिन्स दुखापतीमुळे बाहेर असल्याने इशानकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आणि त्याने या जबाबदारीला साजेशी खेळी खेळत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मात्र, त्याच्या या झंझावाती खेळीचा अंत ज्या पद्धतीने झाला, तो क्षण आयपीएलच्या इतिहासातील सर्वात संस्मरणीय क्षेत्ररक्षणाचा नमुना ठरला. फिल सॉल्टने हवेत झेप घेत पकडलेल्या एका अविश्वसनीय कॅचने इशान किशनला तंबूत धाडले आणि सामन्याचे पारडे फिरवले.

किशन अत्यंत आक्रमक लयीत दिसत होता आणि त्याने केवळ 37 चेंडूंत 80 धावा कुटल्या. या खेळीत त्याने 8 चौकार आणि 5 उत्तुंग षटकार लगावले. हैदराबादच्या डावातील 16 वे षटक अभिनंदन सिंह टाकत होता. या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर इशानने पॉईंटच्या वरुन एक जोरदार फटका मारला. चेंडू ज्या वेगाने बॅटला लागला, ते पाहून तो सीमापार जाणार असेच सर्वांना वाटले. मात्र, त्याचवेळी डीप बॅकवर्ड पॉईंटला तैनात असलेल्या फिल सॉल्टने चित्त्याच्या वेगाने धाव घेतली. चेंडू सीमारेषेच्या जवळ पोहोचत असतानाच सॉल्टने हवेत उडी मारली आणि एक हाताने तो अप्रतिम झेल टिपला. हा झेल इतका विलोभनीय होता की मैदानावरील खेळाडूंसह प्रेक्षकही अवाक झाले. समालोचकांनी देखील सॉल्टचे वर्णन 'सुपरमॅन' असे केले.

फिल सॉल्टच्या या करिश्माई झेलमुळे इशान किशनचे शतक हुकले आणि तो 80 धावांवर बाद होऊन माघारी परतला. आयपीएल 2026 च्या पहिल्याच सामन्यात सॉल्टचा हा झेल 'कॅच ऑफ द सीझन'चा प्रबळ दावेदार मानला जात आहे. सोशल मीडियावर या कॅचचे व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून चाहत्यांकडून सॉल्टच्या चपळाईचे आणि इशानच्या फटकेबाजीचे कौतुक होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: भाजप सरकारचा अहंकार जनता मोडेल! अरविंद केजरीवालांची टीका, कारापूर आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्याचा केला निषेध

Section 39A Protest: आता गावागावांतून आंदोलन! कलम '39अ'विरोधात आमदार वीरेश बोरकर यांची घोषणा

खरी कुजबुज: सरकारची अशीही हुशारी!

दणका! वेर्णात वृक्षतोडीला स्थगिती, उच्च न्यायालयाचा निर्णय; तज्ज्ञ समितीकडून पाहणी

Karapur Mega Project Protest: आंदोलकांना पणजीत रोखले; गुन्हे न नोंदविताच सोडले, मेगा प्रकल्पाविरोधात कारापूरवासी एकवटले

SCROLL FOR NEXT