CSK Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2026 Points Table: मुंबई इंडियन्सची 103 धावांनी धूळधाण, पॉईंट्स टेबलमध्ये 'चेन्नई'ची मोठी झेप; गुजरात अन् दिल्लीला पछाडलं

IPL 2026 Points Table Today: आयपीएल 2026 च्या हंगामात आता रंगत वाढली असून गुणतालिकेतील गणिते दररोज बदलताना दिसत आहेत.

Manish Jadhav

IPL 2026 Points Table Today: आयपीएल 2026 च्या हंगामात आता रंगत वाढली असून गुणतालिकेतील गणिते दररोज बदलताना दिसत आहेत. गुरुवारी (23 एप्रिल) झालेल्या हाय-व्होल्टेज सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सचा 103 धावांनी दारुण पराभव केला. या विजयामुळे चेन्नईने केवळ दोन गुणच मिळवले नाहीत, तर नेट रनरेटमध्ये मोठी सुधारणा करत गुणतालिकेत थेट पाचव्या क्रमांकावर झेप घेतली. चेन्नईच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे मुंबई इंडियन्ससह दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स या संघांना मोठा फटका बसला.

सध्याच्या गुणतालिकेवर नजर टाकली तर, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्स 11 गुणांसह अजूनही अव्वल स्थानी विराजमान आहे. राजस्थान रॉयल्स 10 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर असून त्यांनी आपले स्थान भक्कम केले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु 8 गुणांसह तिसऱ्या आणि सनरायझर्स हैदराबाद 8 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स या तिन्ही संघांकडे प्रत्येकी 6 गुण आहेत, मात्र मुंबईविरुद्धच्या मोठ्या विजयामुळे चेन्नईचा नेट रनरेट कमालीचा सुधारला असून ते पाचव्या स्थानी पोहोचले.

दुसरीकडे, मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) अवस्था मात्र अत्यंत चिंताजनक झाली असून 7 सामन्यांनंतर त्यांच्या खात्यात केवळ 4 गुण आहेत. लखनऊ सुपर जायंट्सची स्थितीही अशीच असून कोलकाता नाईट रायडर्स 3 गुणांसह तळाला संघर्ष करत आहे.

आज म्हणजेच 24 एप्रिल, शुक्रवारी आयपीएलमध्ये पुन्हा एकदा मोठा सामना रंगणार आहे. बंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर घरच्या मैदानावर आरसीबी आणि गुजरात टायटन्स आमनेसामने येतील. आरसीबीकडे (RCB) सध्या 8 गुण असून आजचा सामना जिंकल्यास ते 10 गुणांसह राजस्थान रॉयल्सला मागे टाकत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचू शकतात. दुसरीकडे, सातव्या क्रमांकावर असलेला गुजरात टायटन्सचा संघ हा सामना जिंकून चेन्नईला मागे टाकत पाचवे स्थान मिळवण्यासाठी मैदानात उतरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"आम्हाला फसवलं गेलं...!", पाकिस्तानी लष्कराच्या भूमिकेवर POK मधील आंदोलक संतप्त; 21 जुलैपर्यंतचा दिला अल्टिमेटम

EPFO Interest: करोडो पगारदारांसाठी आनंदाची बातमी! ईपीएफओने व्याजाचे पैसे खात्यात पाठवण्यास केली सुरुवात; असे चेक करा

Viral Video: हातात काठी, जमिनीवर पडलेला माणूस अन् थरकाप उडवणारे दृश्य, भर रस्त्यात बाईकस्वारासोबत घडला अजब प्रकार; अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Gold Silver Price: लग्नसराईपूर्वी ग्राहकांना मोठे गिफ्ट! सोने आणि चांदी एकाच वेळी झाले स्वस्त; पाहा आजचे ताजे दर

VIDEO: 'भगवान श्रीकृष्ण दिवसातून पाच वेळा नमाज पठण करायचे', मौलाना जरजिस अंसारीचा खळबळजनक दावा; हिंदू संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT